subhash phaldesai | Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 10 कोटी द्या, नाही तर डर्टी सिक्रेटस्‌चा 'शोले' प्रदर्शित करू! समाजकल्‍याण मंत्र्याला धमकी देणाऱ्याला जामीन

Goa Crime: अमितने फळदेसाई यांच्‍या विरोधात यापूर्वी चार व्‍हिडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारित केले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पैसे दिले नाहीत, तर त्‍यांच्‍या डर्टी सिक्रेटस्‌चा ‘शोले’ पिक्‍चर व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून प्रदर्शित करू, अशी धमकी देत यू-ट्यूबर अमित नाईक याने दहा काेटी रुपयांची मागणी केल्याचा दावा क्राईम ब्रँचने केला आहे.

हे व्‍हिडिओ आणि इतर साहित्‍य जप्‍त करण्‍यासाठी त्‍याला कोठडीत घेऊन चौकशी करण्‍याची गरज असल्‍याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात फळदेसाई यांचे पीए आणि सोशल मीडिया इन्‍चार्ज सुभाष देसाई यांनी १४ डिसेंबर रोजी तक्रार दिली होती.

या प्रक़रणात अटक होण्‍याच्‍या भीतीने अमित नाईकने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून शुक्रवारी (27 डिसेंबर) या अर्जावर दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांच्‍यासमोर सुनावणी झाली. या अर्जावरील पुढील सुनावणी सोमवार, ३० डिसेंबर रोजी ठेवली आहे. तोपर्यंत नाईक याला अटक करू नये, असे नमूद करून त्‍याला अंतरिम जामीन मंजूर करण्‍यात आला.

त्याच्या जामिनाला सरकार पक्षातर्फे ॲड. ज्‍योतीन ठक्‍कर यांनी विरोध केला. अमितने फळदेसाई यांच्‍या विरोधात यापूर्वी चार व्‍हिडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT