Patto Road in Bad Condition Dainik Gomantak
गोवा

Patto Road in Bad Condition: पाटोवरील ‘तो’ रस्ता विकसकाच्या ताब्यात; साधनसामग्रीसाठी वापर

नगरसेवकाने पाच लाख घेतल्याच्या प्रकरणामुळे उजाळा

दैनिक गोमन्तक

Patto Road in Bad Condition: पाटोवरील संस्कृती भवनासमोर उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इमारतीच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य रस्त्यावरच ठेवले जात आहे. अगोदर या बिल्डरने तात्पुरते कार्यालय रस्त्याच्या बाजूला स्थापन केले. त्यानंतर दोन कार्यालयांची संख्या आता आठ ते दहावर पोहोचली आहे. शिवाय कार्यालय स्थापन करण्यासाठी नगरसेवकाने घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या प्रकरणाला यामुळे उजाळा मिळाला आहे.

पाटो परिसरात मध्यवर्ती ठिकाणी देशात बांधकाम व्यवसायात अग्रेसर असलेल्या कंपनीद्वारे बहुमजली इमारत उभारली जात आहे. या इमारत कामासाठी स्थलांतरीत करता येणारी कार्यालये ठेवण्यासाठी स्वतःच्या जागेचा वापर करण्यात आला नाही. तर इमारतीच्या शेजारील रस्त्याचा कार्यालये स्थापन करण्यासाठी वापर करण्यात आला आहे.

त्यासाठी काम करणाऱ्या कंपनीने एका नगरसेवकास पाच लाख रुपये दिल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू होती. ही बाब एका सामाजिक कार्यकर्त्यानेच पुढे आणली होती. त्यामुळे पैसे घेणारा नगरसेवक कोण? असा सवाल उपस्थित झाला होता. त्याशिवाय हा परिसर ज्या नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रात येतो त्या नगरसेवकाने आणि त्या शेजारच्या प्रभागाच्या नगरसेवकाने महानगरपालिकेच्या बैठकीत पाच लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी काही मंजूर झाली नाही आणि ते प्रकरणही त्याच ठिकाणी शीतपेटीत टाकण्याचे काम झाले.

महापौरांची भूमिका ?

सुरुवातीला काही कार्यालये रस्त्याच्या बाजूला होती. परंतु आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला कार्यालये असून, जेसीबी व इतर इमारतीला लागणारे साहित्यही याच ठिकाणी ठेवले जात आहे. एकंदर हा रस्ताच विकसकाने ताब्यात घेतला असल्याचे दिसत आहे. याबाबत शैलेंद्र वेलिंगकर यांनी व्हिडिओ चित्रित करून याविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्याशिवाय महापौर रोहित मोन्सेरात यांच्या भूमिकेवरही प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT