Patna-Goa Flight Fare
Patna-Goa Flight Fare Dainik Gomantak
गोवा

Patna-Goa Flight: पाटणा-गोवा फ्लाईटसाठी मोठी गर्दी; तिकिट दर 10 हजार रूपयांवर

Akshay Nirmale

Patana-Goa Flight Fare: नवीन वर्ष साजरे करण्यासाठीचे ठिकाण म्हणून देशभरातील पर्यटक गोव्याला पसंती दर्शवितात. आताही नवीन वर्ष काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे गोव्याकडे पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. त्याची प्रचिती वाढलेल्या विमान तिकिटांच्या दरांतून येत आहे.

पाटणा-गोवा फ्लाईटला मोठी गर्दी अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पाटणा-गोवा फ्लाईटचे तिकिटदर १० हजार रूपयांवर गेले आहेत. याशिवाय पाटण्यातून मुंबई, पुणे, जयपूर येथे जाणाऱ्या फ्लाईट्सचेही तिकिट दर वाढले आहेत.

पाटण्यातून मुंबई-पुण्याचे विमानाचे तिकिटदर ९ हजारावर पोहोचले आहेत. जयपूर ५३०० तर कोलकाताचे विमान तिकीट दर ४ ते ५ हजार रूपयांवर पोहचले आहेत. हिंदी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

एकूणच पाटण्यातील या पाच हवाई मार्गांवरील तिकीट दरांत दुप्पट वाढ झाली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचे स्वागत यासाठी पर्यटक या ठिकाणांना भेटी देत आहेत. त्यामुळेच हे तिकिट दर वाढले आहेत. शिवाय पाटण्यातून थेट फ्लाईट असल्याचे त्याचा लाभही पर्यटक घेत आहेत.

पाटण्यातून उत्तर गोव्यातील मोपापर्यंतचे विमानाचे तिकीट 28 ते 31 डिसेंबर या काळात अनुक्रमे 10868 रू., 10368 रू., 10115 रू. आणि 8632 रूपये इतके आहे.

15 डिसेंबरनंतर गोव्यात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार देशविदेशातून पर्यटक गोव्याकडे येत आहेत. ऑक्टोबरपासून सुरू झालेला गोव्याचा पर्यटन हंगाम डिसेंबरमध्ये शिखरावर पोहचतो. नुकतेच गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या टुरिस्ट डेस्टिनेशनमध्येही गोवा दुसऱ्या स्थानी होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT