Kadamba bus stand  Dainik Gomantak
गोवा

मुंडवेल, वास्को येथील कदंब बस स्थानक समस्यांच्या गर्तेत

कदंब बस स्थानकाची दुर्दशा संपेना

दैनिक गोमन्तक

वास्को: मुंडवेल वास्को येथील कदंब बस स्थानकावर पडलेले खड्डे दगड, मातीने बुजवण्यात आले खरे, मात्र कदम बस स्थानकाचे काम कधी चालू होणार व लोकांना अत्याधुनिक बस स्थानक कधी मिळणार असा सवाल बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांच्यासह नागरिकांनी उपस्थित केला आहे.

वास्को येथील कदंब बस स्थानकाची दुर्दशा दिवसेंदिवस वाढत असून पंधरा दिवसांपूर्वी कदंब बस स्थानकावर पडलेले खड्डे दगड, मातीने बुजवण्यात आले होते. या खड्ड्यांमुळे बस गाड्यांची चाके खड्ड्यात जाऊन प्रवाशांना धक्के बसत होते. तसेच प्रवाशांना चिखल तुडवीत बस बसमध्ये जावे लागते. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून खड्डे अधिकच वाढत आहेत. तसेच सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामूळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

चिखलमय रस्त्यातून बस गाड्या जात असल्याने पाणी इतरत्र पसरून सर्व चिखल तयार झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना चिखलातून वाट काढत पुढे जावे लागत आहे. संबंधितांनी खड्ड्यांची दखल घेऊन खड्डे बुजवले खरे, पण येथे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाल्याने बस स्थानक परिसराची दुर्दशा होत चालली आहे.

दरम्यान नवीन कदंब बस स्थानकाची मुहूर्तमेढ 2016 साली मनोहर पर्रीकर यांनी घातला होती. मात्र त्याला अजून चालना मिळत नसल्याने नवीन कदंब बस स्थानक होणार की नाही असा प्रश्न गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail Drug Racket: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT