Kadamba Bus Issue Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Issue: म्हापसा-सुकूर मार्गावरील कदंब बसेसची समस्या कधी सुटणार? संतप्त प्रवाशांचा सवाल

उसकई-पालये मार्गी सुकूरला जाणारी बस सतत बिघडत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

Kavya Powar

Mapusa-Socorro Kadamba Bus Issue: राज्यातील ग्रामीण अंतर्गत भागात असलेल्या कदंब बसेसची समस्या प्रवाशांची डोकेदुखी बनली आहे. म्हापसा ते सुकूर मार्गावरील बसेस बिघडणे आता नित्याचेच झाले आहे. उसकई-पालये मार्गी सुकूरला जाणारी बस सतत बिघडत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

ज्येष्ठ नागरिक, महिला या बसमधून आपल्या वैयक्तिक कामासाठी तसेच दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी म्हापसा मार्केटमध्ये येत असतात. शिवाय विद्यार्थीही या बसमधून प्रवास करत असतात; पण रोजच्या समस्यांमुळे त्यांना या गैरसोयीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार तक्रार करूनही यामध्ये कोणताच बदल होत नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. त्यामुळे सरकारच्या कामावर संतप्त नागरिकांनी ताशेरे ओढले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी सरकारने तत्परतेने कदंब बसेस कर्नाटकात पाठवल्या होत्या.

मात्र सध्या तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त असलेले कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर राज्यात बसेस बंद पडल्यास बदली बस पाठवण्यास असमर्थ असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

तास ते दोन बसची वाट पहावी लागते...

म्हापसा ते सुकूर बस तास ते दोन तासांच्या अंतराने आहेत. त्यामुळे जर एखादी बस चुकली किंवा बंद पडली तर दुसऱ्या बससाठी तब्बल तास-दोन तास वाट पहावी लागते.

सध्याच्या धावपळीच्या जगात इतका वेळ वाया जात असल्याने महामंडळाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT