Boat In Mandovi File Photo
गोवा

Panjim News: मांडवी नदीत बर्निंग बोटचा थरार; बिठ्ठोण जेटीवर प्रवासी बोटला भीषण आग

Boat Fire Goa News: जोरदार वाऱ्यामुळे आग अधिकच भडकली आणि बोटच्या संपूर्ण भागात ती पसरली. आगीने बोटचा पूर्ण ताबा घेतला.

Pramod Yadav

पणजी: मांडवी नदीत प्रवासी बोटला आग लागण्याची घटना शनिवारी (३१ मे) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. बिठ्ठोण जेटीवरील एमव्ही के-कॅट या प्रवासी बोटला आग लागली. आगीची घटना घडली त्यावेळी बोटमध्ये कोणी प्रवासी अथवा कर्मचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिठ्ठोण जेटीवरील एमव्ही के-कॅट ही प्रवासी बोट उभी करण्यात आली होती. या बोटला अचनाक आग लागली, जोरदार वाऱ्यामुळे आग अधिकच भडकली आणि बोटच्या संपूर्ण भागात ती पसरली. आगीने बोटचा पूर्ण ताबा घेतला. पाण्याच्या प्रवाहामुळे ही बोट हळुहळू बंदर खात्याच्या कार्यालयापर्यंत आली. अखेर या घटनेची माहिती बंदर खाते आणि अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली.

बंदर खात्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बोटीला लागलेली आग आटोक्यात आणली. या बोटीवर सुदैवाने कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बोटीला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याप्रकरणचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन पार्किंगचे दर वाढले!

Sarvona: सर्वण पंचायतीचे लाखो रुपये वाया! जाळीसह, लोखंडी रॉडही गायब,कचरा नियंत्रणाच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ

Purple Fest: आमीरसोबत 'सितारे जमीन पर'ची टीम येणार गोव्यात? कलाकारांना केले आवाहन; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

'गुंड निर्धास्‍त आणि सामान्‍य जनता घाबरली आहे'! सरदेसाईंचे टीकास्त्र; काणकोणकर हल्‍लाप्रकरणी सूत्रधाराचे नाव जाहीर करण्याची मागणी

Chimbel: 'सरकारने हट्टाला पेटू नये, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये', चिंबलवासीय लढ्याच्या तयारीत; युनिटी मॉलला कडाडून विरोध

SCROLL FOR NEXT