Urban Development Minister Milind Naik Dainik Gomantak
गोवा

'पक्षाचे कार्य करताना कार्यकर्त्यांनी समाजउपयोगी काम करावे'

युवकांनी समाज कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) यांनी केले.

दैनिक गोमन्तक

युवकांनी पक्षाचे कार्य करताना समाज उपयोगी कार्यात सहभागी व्हावे. जेणेकरून भविष्यात याचा फायदा पक्ष बळकट करण्यासाठी उपयोगी ठरेल. यासाठी युवकांनी समाज कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन मुरगावचे (Murgaon) आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) यांनी केले.

राज्य भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व भाजप मुरगाव युवा मोर्चा मुरगाव आयोजित मुख्यमंत्री चषकाचे औचित्य साधून देस्तेरो भागातील मगो पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते राजू सावंत, मुरगांव कॉंग्रेसचे रोहन सावंत, सुरज सिंग काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. व्यासपीठावर मुरगावचे नगराध्यक्ष यावेळी दामोदर कासकर, मोरगाव भाजप गटाध्यक्ष तथा राज्य आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेवक दया नाईक, दामू नाईक, रामचंद्र कामत, लिओ रॉड्रिगीसरॉड्रिगीस, नगरसेविका मंजुषा पिळर्णकर, मृणाली मांद्रेकर, प्रजय मयेकर, माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब, माजी नगरसेवक मुरारी बांदेकर, कृष्णा तोरस्कर, मुरगाव भाजप महिला मोर्चा अध्यक्ष छाया होन्नावरकर, रमिला आरोलकर, अल्पसंख्यांक विभागाचे डॅनिएल डिसोझा, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदेकर, प्रसाद सातार्डेकर, जयप्रकाश पेडणेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना नगरविकास मंत्री नाईक म्हणाले की राज्यात भाजपचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आहे. पक्षाचे कार्य युवकाबरोबर महिला वर्गाचा महत्वाच महत्त्वाचा वाटा असून भविष्यात भाजपचे कार्य पुढे नेण्यासाठी युवकांनी समाजोपयोगी कार्यात सहभाग दाखवावा तेव्हाच पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

मुरगाव नगराध्यक्ष संजय सातार्डेकर (Sanjay Satardekar) यांनी भाजपात प्रवेश केला. देस्तेरो भागातील मगो व काँग्रेस कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कोळमकर तर उपस्थितांचे स्वागत युवा अध्यक्ष योगेश बांदेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT