Trinamool Congress

 

Dainik gomantak

गोवा

'ज्या पक्षाला तृणमूल पाठिंबा देणार तोच पक्ष राज्यात सरकार चालवणार'

एकही पक्ष बहुमत सिद्ध करू शकत नाही, तृणमूल काँग्रेस महिलांसाठी आखतय 'या' योजना

दैनिक गोमन्तक

पुढील वर्षी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत एकही पक्ष बहुमत सिद्ध करू शकणार नाही. मात्र एखाद्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिल्यास राज्यात महिला वर्गासाठी ग्रह लक्ष्मी योजना, दर महिन्याला पाच हजार रुपये, दोन महिन्यात सुरुवात करणार असल्याची माहिती मुरगाव तालुका तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. वास्को येथे आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती मुरगाव तालुक्यातील तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी हेंद्रिक गांधी, महेश भंडारी, दीक्षा तळवणेकर, जय शेटगावकर यांनी दिली.

पुढे बोलताना हेंन्रिक गांधी म्हणाले की, गोव्यातील भाजप (BJP) सरकारने गृहीणींना ग्रह आधार योजना सुरू केली, मात्र महिलावर्गात ही योजना योग्य वेळी मिळत नसल्याने सरकार सामान्य जनतेला वाढत्या महागाई बरोबर आर्थिक संकटात टाकत आहे. गोव्यात (goa) पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) तृणमूल काँग्रेसचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येऊन सरकार स्थापन करण्यासाठी ज्या पक्षाला पाठिंबा तृणमूल पक्ष देणार तोच पक्ष राज्यात सरकार चालवणार.

तृणमूल (Trinamool) काँग्रेसने राज्यात घरोघरी प्रचार करून ग्रहणीला दर महिन्याला पाच हजार रुपयांची ग्रहलक्ष्मी योजना सुरू करणार असल्याची माहिती दिली. या पक्षाला ग्रहीणी कडून चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. तृणमूल काँग्रेसचे (Congress) सचिव अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले आहे की, राज्यात तृणमूल काँग्रेस स्थापना झाल्यास ग्रहलक्ष्मी योजना दोन महिन्यात सुरू करणार. राज्यातील दोन लाख पेक्षा जास्त महिलांनी तृणमूलच्या योजनेला पाठिंबा देऊन सदस्य झाले आहेत. वास्कोत गेल्या दहा वर्षात माजी आमदार कार्लुस आल्मेदा याने एकही विकासाची कामे केली नाही.

मात्र त्याने गरजूंना सरकारी नोकऱ्या पुरविल्या. तरीसुद्धा आल्मेदा आमदार (MLA) म्हणून वास्कोत अपयशी ठरले असल्याची माहिती केंद्रीय गांधी यांनी दिली. यावेळी जयेश शेटगावकर यांनी मुख्यमंत्री (CM) सावंत यांच्यावर आरोप करताना माहिती दिली की, युवकांना नोकर्‍या देण्यात व विकास करण्यास सरकार (Government) पूर्णपणे अपयशी ठरला आहे. मुरगावात विकास स्वतःपुरते झाला असल्याची माहिती शेटगावकर यांनी दिली. यावेळी दाबोळी मधील तृणमूल काँग्रेसचे सदस्य महेश भंडारी यांनी सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधी जॉगर्स पार्क बांधून फक्त इमारत बांधकाम वासियांना आर्थिक फायदा करून दिलेला आहे. दाबोळी विकासापासून खूपच मागे राहिलेला मतदार संघ असल्याची माहिती शेवटी भंडारी यांनी दिली. याप्रसंगी दीक्षा तळवणेकर यांनी गृहलक्ष्मी योजनेची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT