Goa night parties  Dainik Gomantak
गोवा

Goa Night Parties: उत्तर गोव्यातील किनारपट्टीभागात पहाटेपर्यंत पार्ट्या सुरूच...

ध्वनी प्रदूषणसंदर्भात न्यायालयीन आदेशाची सर्रास पायमल्ली

Akshay Nirmale

Goa Night Parties: उत्तर गोव्यातील किनारीपट्ट्यातील रात्री देखील दिवसा प्रमाणे झगमगाट झाली आहे. मध्यरात्री ते पाहाटेपर्यंत येथे मोठ्या आवाजात पार्ट्या सुरू असून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. मुख्य म्हणजे पार्ट्या सुरू असलेल्या ठिकाणीपासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असूनही दोन किलोमीटरच्या अखत्यारीत एकही पोलिस नाही. परिणामी ध्वनी प्रदूषणसंदर्भात न्यायालयीन आदेशाची पायमल्ली होत आहे.

रात्री 10 वाजेपर्यंत संगीत बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यापासून पोलिस यंत्रणेने त्याची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती सरकारकडून दिली जात आहे. लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम 10 वाजल्यानंतर वेळ झाल्याचे सांगून बंद केले जात आहेत. परंतु किनारपट्टी भागात हा नियम लागू होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे एकाच ठिकाणी पाच ते सहा पार्ट्या होत आहेत. पार्ट्यांमध्ये वाजणाऱ्या कर्कश संगीतामुळे प्रचंड ध्वनी प्रदूषण होत आहे. पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकही सरकारी यंत्रणेतील कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने न्यायालयीन आदेश कागदोपत्रीच मर्यादित राहिला आहे.

सायंकाळी 7 वा. किनारपट्टी सुरू झाल्यानंतर पाहाटे 6 पर्यंत देखील काही पार्ट्या चालतात. पार्ट्यांना येणाऱ्यांमध्ये 98 टक्के ग्राहक पर्यटक असून एका व्यक्तीला प्रवेश घेण्यासाठी शुल्क 8 हजार ते 15 हजारपर्यंत आहे. त्यामुळे सर्वसामान्‍य आणि स्थानिक व्यक्ती येथे येण्याचा सवालच येत नाही. तरी पार्ट्यांना जाण्यासाठी देशी व विदेशी पर्यटकांनी गर्दी केली आहे. एरवी पोलिस रात्री गस्त घालतात पण येथे मध्यरात्रीदेखील पोलिस वाहन दिसत नाही. पर्यटक रस्त्यावरच राहून धूम्रपान आणि मद्यपान करत आहेत, मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे कोणीही नाही. पोलिसांनी जणू सगळी जबाबदारी पार्ट्यांमध्ये असलेल्या बाऊंसरवरती टाकल्याची टीका होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT