Swamala Ayurvedic product advertisement Dainik Gomantak
गोवा

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Paresh Rawal Swamala Campaign: दीडशे वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाचा वारसा जपणाऱ्या श्री धूतपापेश्‍वर लिमिटेडने अभिनेता परेश रावल यांच्याबरोबरची भागीदारी सलग तिसऱ्या वर्षी कायम ठेवली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पुणे: दीडशे वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाचा वारसा जपणाऱ्या श्री धूतपापेश्‍वर लिमिटेडने अभिनेता परेश रावल यांच्याबरोबरची भागीदारी सलग तिसऱ्या वर्षी कायम ठेवली आहे. यानिमित्त कंपनीच्या ‘स्वमाला’ या प्रमुख रसायन ब्रॅण्डसाठी नवीन मल्टिमीडिया मोहिमेची घोषणा करण्यात आली. दूरदर्शन, मुद्रित आणि डिजिटल माध्यमांतून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

आयुर्वेदातील पारंपरिक तत्त्वे, गुणवत्ता आणि प्राचीन ज्ञान यांचा प्रचार करणे, हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. रावल यांच्या विश्‍वासार्ह आणि सहज संवादशैलीतून आरोग्याबाबत योग्य माहिती व जागरूकतेचा संदेश दिला जाणार आहे. ‘स्वमाला’ हे सोने आणि विविध आयुर्वेदिक घटकांनी तयार केलेले पौष्टिक च्यवनप्राश आहे. आयुर्वेदिक शास्त्रातील पारंपरिक पद्धतींचे पालन करून त्याची निर्मिती केली जाते. ‘स्वमाला रोजाना, सेहत का खजाना’ असा मोहिमेचा नवा मंत्र आहे.

१८७२ मध्ये पनवेलमध्ये स्थापन झालेली श्री धूतपापेश्‍वर लिमिटेड ही जुन्या आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे, असे कंपनीतर्फे सांगितले आहे. अभिनेते रावल म्हणाले, ‘‘प्रामाणिकपणा हाच खरा वेगळेपणा आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाशी तडजोड न करता वाटचाल करणाऱ्या श्री धूतपापेश्‍वरबरोबर तिसऱ्या वर्षीही सहयोग कायम ठेवताना मला अभिमान वाटतो.’’

परेश रावल यांचा प्रामाणिकपणा, विश्‍वासार्हता आणि लोकांशी असलेले त्यांचे चिरस्थायी नाते त्यांना श्री धूतपापेश्‍वर लिमिटेडसाठी एक स्वाभाविक सदिच्छादूत बनवते. आम्ही एकत्र तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना, सैद्धांतिक आयुर्वेदाचा संदेश नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवताना आम्हाला आनंद होत आहे.

- रणजित पुराणिक, व्यवस्थापकीय संचालक, श्री धूतपापेश्‍वर लिमिटेड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT