सरकारी शाळा  Dainik Goamantak
गोवा

सरकारी शाळा टिकवण्यासाठी पालकांनी पुढे यावे: अमित सावंत

मांद्रे सरकारी शाळेत भाऊसाहेब बांदोडकर जयंती

दैनिक गोमन्तक

मोरजी: भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुरू केलेल्या सरकारी प्राथमिक शाळा टिकविण्यासाठी व या शाळांच्या विकासासाठी पालकांनी पुढे यावे. या शाळा भविष्यातही सुरूच राहतील यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन मांद्रे शाळेचे माजी विद्यार्थी ॲड.अमित सावंत यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना मांद्रे येथे केले.

सरकारी प्राथमिक विद्यालय सावंतवाडा मांद्रेचा वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम आणि भाऊसाहेब जयंती कार्यक्रमात भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर केले. यावेळी निमंत्रित पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार पी.ए.सूर्यवंशी,पंचसदस्य राजवी सावंत, शाळेचे अध्यक्ष तुळशीदास गावडे, मुख्याध्यापक चंद्रकांत कांबळी, सी आर.पी नेहल पालयेकर व पालक हिम्मत कुमार पटेल , गोपीचंद आपुले आदी उपस्थित होते.

अॅड. सावंत पुढे म्हणाले, सरकारी प्राथमिक स्तरावर मराठी भाषेत शिकून आज गोवेकर मोठ्या हुद्द्यावर पोचले आहेत. सरकारी प्राथमिक विद्यालयात शिक्षक हे अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. यावेळी विद्यार्थी कु.प्रथम कृष्णा शेटगावकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावर भाषण केले. यावेळी शालेय वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

यामध्ये प्रथम शेटगावकर, साईश सावंत, साई नाईक, शंकर सावंत, सर्वेश साळगावकर, गोविंद सावंत, ओंकार सावंत, समृद्धी सावंत, दुर्वा सावंत, कविता मोरजकर, आर्यन येडगे व ऐश्वर्या चिरडेकर यांच्यासह विविध विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT