Gomantak Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Gomantak Bhandari Samaj: गोमंतक भंडारी समाजाच्या नव्या समितीपूर्वीच अनेकांचा काढता पाय, समाजात फूट पाडण्याचा संशय; सत्ताधारी गटाकडे अंगुलिनिर्देश

Gomantak Bhandari Samaj Controversy: वास्को येथे ६ ऑक्टोबरला झालेल्या समाजाच्या आमसभेत १५ सदस्यीय समिती निवडण्यात आली होती. तीच समिती गोमंतक भंडारी समाज संघटनेला समांतर समिती म्हणून घोषित करण्याचे ठरवण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Parallel Committee Controversy In Gomantak Bhandari Samaj Goa

पणजी: गोमंतक भंडारी समाज संघटनेच्या केंद्रीय समितीला समांतर अशी समिती जाहीर करून समाजात फूट पाडण्याचा उद्योग काहींनी चालवला आहे. याचा संशय आल्याने या समितीची घोषणा होण्याआधीच अनेकांनी काढता पाय घेणे पसंत केले आहे.

वास्को (Vasco) येथे ६ ऑक्टोबरला झालेल्या समाजाच्या आमसभेत १५ सदस्यीय समिती निवडण्यात आली होती. तीच समिती गोमंतक भंडारी समाज संघटनेला समांतर समिती म्हणून घोषित करण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे समाजात दोन समित्यांवर संभ्रम निर्माण होऊन दुहीचे वातावरण तयार होईल, फूट पडेल अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे. अशी फूट पाडण्यामागे कोणीतरी प्रबळ असावा असा संशयही घेतला जात आहे. यासाठी सत्ताधारी गटाकडे अंगुलिनिर्देश केला जात आहे.

म्हापशाचे नगरसेवक तारक आरोलकर यांनी या नव्या समांतर समितीविषयी नापसंती व्यक्त केली. त्यांचे नाव या संभाव्य समांतर समितीच्या सदस्यपदासाठी घेतले जात आहे. त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की समांतर समितीची अजिबात गरज नाही. या समितीच्या उपाध्यक्षपदासाठी माझे नाव घेतले जात असल्याचे काहींनी खासगीत सांगितले असले तरी मला अधिकृतप

कोण काय म्हणाले..?

१ तारक आरोलकर म्हणाले, गोमंतक भंडारी समाजाची नवी समांतर समितीची गरज नाही. समाज संघटनेच्या अध्यक्षपदावर देवानंद नाईक व त्यांचे सहकारी निवडून आल्यानंतर त्याला जिल्हा संस्था निबंधक आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर रीतसर पुन्हा निवडणूक घेऊन नवी समिती निवडता येईल. समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी दुसरी समिती नको.

२ चारुदत्त पणजीकर यांनी सांगितले, की अशाने समाज दुभंगेल. समाजात कोणीतरी फूट पाडू इच्छीत आहे. त्यातूनच समांतर समितीची संकल्पना पुढे आली आहे. गोमंतक भंडारी समाज संघटनेची झालेली निवडणूक आणि निवडून आलेली समिती याला न्यायालयात (Court) आव्हान दिले आहे. त्याचा निकाल आधी लागू द्या. समाजाची दोन शकले होता कामा नये, यासाठी समांतर समिती नको.

३ देश किनळेकर यांनी सांगितले, की समांतर समिती जाहीर केली तर समाजात फूट पडू शकते. समाजाची निवडणूक झाल्यानंतर त्याला आव्हान दिले आहे. त्‍याचा निकाल लागू दे नंतर काय ते ठरवता येईल. आताच समांतर समिती नको.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT