Goa Shigmotsav 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav: पणजीत ‘ओस्सय ओस्सय’चा नाद

आज मिरवणूक : रात्री दहापूर्वी सोहळा आटोपण्याचे बंधन

गोमन्तक डिजिटल टीम

गोमंतकीय लोकसंस्कृती, लोकपरंपरा यांचे प्रतिबिंब जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या शिगमोत्सव चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आदींचे प्रदर्शन आणि ढोल ताशा आणि कासाळ्याच्या एकत्रित वादनाने निर्माण होणाऱ्या घणचे कटर घणचा निनाद आज राजधानी पणजीत घुमणार आहे. यासाठी शहरात आकर्षक सजावट करण्यात आली असून पणजी शिगमोत्सव समितीची मिरवणुकीची तयारी अंतिम टप्यात पोहोचली आहे.

आज (शनिवारी) सायं. 4 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत काकुलो बेटाशेजारील श्री सावरेश्‍वराचे दर्शन घेऊन सायं. 4 वा. मिरवणुकीला सुरूवात होईल. वेशभूषा, रोमटामेळांचे आगमन होईल. सायं. 7 वा. चित्ररथ देखावे मिरवणुकीत सहभागी होतील. मात्र, रात्री दहापूर्वी मिरवणूक आटोपण्याचे आयोजकांपुढे आव्हान आहे.

पणजीतील शिगमोत्सव मिरवणुकीचे नागरिकांसह कलाकारांनाही आकर्षण आहे. राज्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकही मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात. पर्यटन खात्याद्वारे मिरामार, पणजी बसस्थानकाशेजारील दिवजा सर्कल येथे गोमंतकीय लोककला सादरीकरण्याच्या प्रतिकृती उभारल्या असल्याने तसेच आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

मिरवणुकीस उशिरापर्यंत परवानगी द्या !

शिगमोत्सव मिरवणुकींचे खास आकर्षण हे विविध पौराणिक कथांवर आधारीत चित्ररथ असतात. चित्ररथ आकर्षक आणि चित्तवेधक व्हावा,यासाठी कलाकार अथक प्रयत्न करतात. विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईंचा या चित्ररथात वापर केला जातो.

परंतु चित्ररथांना संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वीच मिरवणुकीत सामील व्हावे लागणार आहे. त्यामुळे कलाकारांच्या कष्टावर पाणी फेरले जाणार असल्याच्या भावना व्यक्त होत असून शिगमोत्सव काळात उशिरापर्यंत मिरवणुकींना परवानगी द्यावी, अशी भावना जनमानसात आहे.

गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रात्री 10 नंतर कोणत्याही ध्वनिप्रदूषणास बंदी घातल्याने पणजी शिमगोत्सव सिमितीद्वारे नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी रोमटामेळ तसेच चित्ररथ पथकांना काही नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. रोमटामेळ, पथकांनी 3.30 फ्लॅगकार्ड घेऊन जाणे बंधनकारक आहे.

तसेच रोमटामेळ पथकांनी 4 वा. चित्ररथ पथकांनी 7 वा. मिरवणुकीत सहभागी होणे बंधनकारक आहे. मिरवणूक मार्गावर समितीचे स्वयंसेवक पोलिस सांगतील, तेथेच रिंगण/मोड सादर करावे. अन्य कोणत्याच ठिकाणी रिंगण/मोडाचे सादरीकरण करू नये. रिंगण/मोड घालण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेऊ नये.

चित्ररथ मिरवणूक संध्या. 7 वा. सुरू होऊन ती 9.30 वाजेपर्यंत आझाद मैदानावर पोचणे बंधनकारक असेल. पथकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना स्पर्धेतून बाद ठरविले जाईल, असे पणजी शिगमोत्सव समितीने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT