vehicles Dainik Gomantak
गोवा

Panjim: पणजीत मर्जीतील लोकांनाच मिळाले वाहन पार्किंग स्टिकर

रहिवाशांना त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग स्टिकर देण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पुढे आला होता.

दैनिक गोमन्तक

Panjim: महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना वाहन पार्किंगसाठी विशेष स्टिकर द्यावेत अशी मागणी गेल्‍या कित्‍येक महिन्‍यांपासून नगरसेवक करीत आहेत. मात्र सध्या काही प्रभागांतील मर्जीतील वाहनधारकांनाच हे स्टिकर मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत आयुक्त किंवा महापौरांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे हे स्टिकर नक्की कोणाकडून बाहेर वाटले गेले, याची आता चर्चा सुरू झाली आहे.

पणजी शहरात वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. अनेक इमारतींना पार्किंगची सोय नसल्याने रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केली जातात. त्यामुळे अशा रहिवाशांना त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग स्टिकर देण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पुढे आला होता.

तत्कालीन उपमहापौर वसंत आगशीकर यांनी हा प्रस्ताव महापालिकेच्या बैठकीत मांडला होता. त्यावेळचे महापौर उदय मडकईकर व इतरांनी तो मंजूरही केला होता.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक नगरसेवकाकडे रहिवाशांच्या वाहनांची संख्या आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकामार्फतच स्टिकरचे वाटप करणे आवश्‍यक होते. परंतु काही मर्जीतील लोकांनाच ते देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT