Fraud in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारचा प्रतिनिधी असल्याचं भासवत लाखोंचा गंडा

महाराष्ट्रातील व्यक्तीची फसवणूक केल्याच्या आरोपात पणजी पोलिसांकडून एकाला बेड्या

दैनिक गोमन्तक

पणजी : तब्बल 15 लाखांची फसवणूक केल्या आरोपाखाली पणजी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. वामन कुमार असं या आरोपीचं नाव असून महाराष्ट्रातील एका व्यक्तीला त्याने सरकारचं नाव वापरुन गंडा घातल्याचं स्पष्ट झालं आहे.

वामन कुमार नावाच्या एका व्यक्तीने महाराष्ट्रातील अजित कुडे नामक व्यक्तीची 14.85 लाखांची फसवणूक केली आहे. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या एका व्यावसायिकाची लूट केल्याप्रकरणी पोलिसांनी वामन कुमारला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही फसवणूक करताना आरोपीने गोवा सरकारचा प्रतिनिधी असल्याचा बनाव केल्याचंही आता तपासात समोर आलं आहे.

आरोपीने अजित कुडे यांना फोन केला आणि आपण गोवा राज्य सरकारचा (Goa Government) प्रतिनिधी असल्याचं भासवलं. तसंच टेंडर प्रक्रियेत मदत करण्याचा बनाव करत आपली कचरा व्यवस्थापन मंत्र्याशी ओळख असल्याचंही सांगितलं. दाखल केलेल्या तक्रारीत आरोपीने एका अनोळखी व्यक्तीशी संभाषण घडवल्याचंही नमूद करण्यात आलं आहे, ज्याने आपण मंत्री असल्याचा दावा केला होता. यानंतर चिखलीत बायोगॅस प्लांट बांधण्यासाठी टेंडरसाठी 14.85 लाखांची रक्कम देण्यास सांगितलं. मात्र जेव्हा आपली फसवणूक (Fraud) झाल्याचं कुडे यांना समजलं त्यांनी पोलिसात धाव घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tuyem Pernem: ..आनंदाची बातमी द्यायला चालले आणि गमावला जीव! तुये-पेडणेतील दुःखद घटना; गुरांना वाचवण्याचा नादात अपघाती मृत्‍यू

Goa Politics: खरी कुजबुज; शेतकऱ्यांचा फंड संपला!

Goa Tourism: गोव्यात पर्यटक वाढले तरी हॉटेल व्यावसायिक नाराज! रशियन, ब्रिटीश पर्यटकांची पाठ; हडफडे दुर्घटनेचा उत्तरेत परिणाम

Vijay Merchant Trophy 2025: सलग 5व्या पराभवासह गोव्याचा संघ घरी! विजय मर्चंट करंडकात हाराकिरी; कर्नाटक डावाने विजयी

Hardik Pandya: टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय! न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पंड्या संघाबाहेर? बुमराहलासुद्धा विश्रांती

SCROLL FOR NEXT