Panjim police arrest accused  Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case : महाठग! आधी ड्रायव्हर मग IAS अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून घातला 10.55 लाखांचा गंडा

पणजी पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. अंमली पदार्थ, लैंगिक अत्याच्यार, खून असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच आज पणजी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. फसवणूक केल्याच्या गुन्हा दाखल करीत दोघांना अटक करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आयएएस अधिकाऱ्याचा पीए असल्याचे व एका तारांकित हॉटेलसाठी भाडेपट्टीवर वाहन लावण्याचे कंत्राट देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

हा प्रकार उघडकीस येताच पणजी पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना आज शिताफीने अटक केली. संशयितांनी एकूण 10.55 लाखांना गंडा घातला आहे. समीर धावस्कर व दिनकर सावंत रा. सर्वण- डिचोली असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.

संशयित समीरने आयएएस अधिकाऱ्याचा ड्रायव्हर असल्याचे सांगून सरकारी नोकरी देण्याच्या नावेही अनेकांना 2.12 कोटींचा गंडा घातल्याचेही उघड झाले आहे. गेल्या काही दिवसापासून पोलिस संशयितांचा शोध घेत होते. मात्र, ते वेळोवेळी चकमा देत होते. अखेर आज संशयितांना गजाआड करण्यात पणजी पोलिसांना यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT