Panjim | Senior Citizen Dainik Gomantak
गोवा

Panjim: गोव्यातील मनोरंजन केंद्रांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी हसत-खेळत उपक्रम

Panjim: मळ्यातील बी. एन. मेलवानी ज्येष्ठ नागरिक मनोरंजन हे केंद्र आता पुढील वर्षी तृतीय वर्षात होणार पदार्पण आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim: वयाची साठी ओलांडली की पुढे सेवानिवृत्ती आणि त्यानंतर घरातील व्यक्ती सांगतील, तसे वागण्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो. याशिवाय अनेक ज्येष्ठांकडे मुलांना किंवा त्यांच्या सुनांना त्यांच्याकडे पाहण्याचीही फुरसत नसते, मग अशा ज्येष्ठ नागरिकांच्या मनात निराशा येऊ लागते. अशी निराशा दूर करण्याचे आणि उर्वरित आयुष्य हसत-खेळत पर्यायी लहान मूल होऊनही जगता येते, याची अनुभूती मिळते ती मळ्यातील बी. एन. मेलवानी ज्येष्ठ नागरिक मनोरंजन केंद्रांत.

ज्येष्ठांसाठीचे हे केंद्र आता पुढील वर्षी तीन वर्षे पूर्ण करीत आहे. केवळ पणजी व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना हे केंद्र सोयीचे होईल, असे वाटत असताना आता या केंद्राचे आजीवन सदस्य संख्या दीडशेवर पोहोचली आहे. मडगाव, डिचोली, पर्वरी अशा ठिकाणाहून सदस्य या केंद्रात येतात. हॉटेल व्यावसायिक राजा मेलवानी वडील बसंतराय निहालचंद मेलवाणी यांच्या नावे बी. एन. मेलवानी ज्येष्ठ नागरिक मनोरंजन केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे काम कल्पना देशपांडे या पाहतात.

दीडशे सदस्य असलेल्या या केंद्रात दररोज 30-35 सदस्य सकाळी आणि संध्याकाळी येतात. वाहतूक व्यवस्था बंद होती, त्याचा परिणाम मध्यंतरी झाला. अलीकडे लोक येण्याचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी शहरातून मळा व पुन्हा शहर अशी बस होती ती बंद झाली आहे.

त्याशिवाय सांताक्रूझच्या बसफेऱ्या कमी झाल्याने लोकांना येणे अवघड होत आहे. दिवसभरात कोणी सदस्य आले तर त्यांना कॅरम, पत्ते किंवा व्यायाम करायचा झाल्यास साहित्य आहे. त्याशिवाय काही पुस्तकेही आहेत, ते वाचू शकतात. याशिवाय मनोरंजन म्हणून टीव्ही किंवा गाणी लावून ऐकूही शकतात. डॉ. सेल्सो हे विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी योगा शिकवतात. महिन्यातून डॉ. सेल्सो यांच्यामार्फत नागरिकांची रक्त तपासणी होते.

...शनिवारी वाढदिवस

कोणाचा ना कोणाचा कोणत्या ना कोणत्या महिन्यात वाढदिवस असतो. तो वाढदिवस त्या तारखेला न साजरा करता दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी येथे सामाजिक दिवस म्हणजेच वाढदिवस साजरा करण्याचा दिवस. ज्याला हवा तसा तो ती व्यक्ती वाढदिवस साजरा करते. ज्यांना काय हवे वाटते ते लोक घेऊन येतात आणि वाढदिवस साजरा करतात. अगदी लहान मूल होऊन सर्व खेळ आणि इतर उपक्रमांतून नागरिक आनंद शोधत असतात. याशिवाय दिवाळी, ख्रिसमस या सणानिमित्त प्री-दिवाली व प्री-ख्रिसमसही येथे साजरा करण्यात आला.

असे असतात इतर उपक्रम

  • याशिवाय सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी किनारे स्वच्छता मोहीम ज्येष्ठ नागरिक राबवितात. यासाठी काही मोजक्याच नागरिकांना निमंत्रित केले जाते, कारण त्यांना नेण्याची आणण्याची जबाबदारी असते, यासाठी ही संख्या मर्यादित असते. अशा उपक्रमांसाठी हे नागरिक मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुक असतात, हे विशेष.

  • विरंगुळा म्हणून प्रत्येक वर्षी सहलीचे आयोजन केले जाते, त्यातूनही सदस्य हिरहिरीने सहभाग नोंदवितात.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग होण्यासाठी केंद्रातर्फे प्रोत्साहन दिले जाते.

  • होमिओपॅथी डॉक्टरांकडून तपासणी करण्याची सोयही उपलब्ध.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT