Panjim City Dainik Gomantak
गोवा

Panjim City: स्मार्ट सिटी पणजीतील मार्केट बनले पिचकाऱ्यांनी 'लालेलाल'

Panjim: पणजी मार्केट गुटखा, पान आदींचे सेवन करणाऱ्यांनी विविध ठिकाणी थुंकून लालेलाल केले आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim City: कोणतेही गाव असो किंवा शहर प्रामुख्याने केवळ दोन ठिकाणीच मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. एक बसस्थानक आणि दुसरे म्हणजे मार्केट, बाजाराचे ठिकाण. पणजी शहरातील बसस्थानकाची दुर्दशा झालीच आहे. मात्र, सुस्थितीतील पणजी मार्केट गुटखा, पान आदींचे सेवन करणाऱ्यांनी विविध ठिकाणी थुंकून लालेलाल केले आहे. यामध्ये केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. नागरिकांनीदेखील आपले कर्तव्य जाणून अस्वच्छता, थुंकणे आदी प्रकार टाळणे गरजेचे आहे.

पणजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांद्वारे नियमितपणे मार्केट परिसरात साफसफाई, झाडलोट केली जाते. मात्र, अनेक नागरिक तसेच काही मार्केटमधील व्यापारी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून मार्केटचे कोपरे थंकून लाल करतात. त्यामुळे अस्वच्छता होतेच, त्यासोबतच आरोग्याचे प्रश्‍नदेखील उपस्थित होतात. अशा कृत्यांवर कडक कारवाई करण्याची गरज पणजीतील नागरिक व्यक्त करत आहेत.

कोपरे लालभडक

पणजी मार्केटमधील बहुतांशी कोपरे पिचकाऱ्या मारून लालभडक झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण वास्तू विद्रूप दिसते. तेथे स्वच्छता करणे तसेच मार्केटची रंगरंगोटी करणे गरजेचे आहे. तसेच त्यानंतर देखील अशा प्रकारची कृत्ये जर कोण करत असेल तर त्यावर संंबंधित प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

अद्ययावत बांधणी आवश्‍यक

मासळी मार्केटमध्येदेखील सकाळ-संध्याकाळ साफसफाई केली जाते; परंतु मासळी मार्केटची पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे. अद्ययावत स्वरूपात जर बांधणी केली तर स्वच्छता राखणे सुकर होईल तसेच तेथे मासळीचे पाणी साचणार नाही आणि या पाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधीदेखील नाहीशी होईल. मासळी मार्केटमुळे अधिक प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे.

कावळ्यांची झुंबड

मासळी मार्केटमधील दुर्गंधीने तसेच कचऱ्याच्या वासाने मोठ्या प्रमाणात या परिसरात कावळे जमा होतात. दुपारच्या वेळी सांडलेल्या मासळीवर तसेच साफ केलेल्या मासळीचा उर्वरित भाग खाण्यासाठी कावळ्यांची झुंबड उडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT