Private Bus Stop At Patto
Private Bus Stop At Patto Dainik Gomantak
गोवा

Private Bus Stop At Patto: खासगी ट्रॅव्हल्सचा पाटोवर थांबा! ईडीसीची मालकी

गोमन्तक डिजिटल टीम

Private Bus Stop At Patto

पाटोवरील आर्थिक विकास महामंडळाच्या जागेत एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा थांबा सुरू झाला आहे. कित्येक दिवसांपासून एक ट्रॅव्हल कंपनी या जागेचा वापर करीत आहे. त्यामुळे या कंपनीला आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) कशी काय परवानगी दिली, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पाटोवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका नामांकित हॉटेलच्या बाजूला बसथांबा चालत असून त्या ठिकाणाहून या ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे बसमध्ये प्रवासी घेतले जातात. आंतरराज्य सेवा देणारी ही ट्रॅव्हल्स कंपनी असून प्रवाशांबरोबर काही खासगी कुरिअर कंपन्यांच्या साहित्याचीही या बसेसमधून ने-आण होते. यामुळे या बसथांब्याला ईडीसीने कशी परवानगी दिली? परवानगी कोणत्या नियम व अटीनुसार दिली, असा सवालही आता उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीसीने महानगरपालिकेकडे पाटोवरील देखभाल, स्वच्छतेचे काम सोपविले आहे. अजूनही ईडीसीचा या जागेवर मालकी हक्क आहे. यापूर्वी पाटोवर बहुउद्देशीय प्रकल्पांची कार्यालये रस्त्याच्या बाजूला स्थापन करण्यासाठी एका नगरसेवकाने मोठा आर्थिक व्यवहार केल्याचे प्रकरण घडले होते. त्यावरून महानगरपालिकेच्या बैठकीत यावरून बराच गदारोळ झाला होता, परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न केला नाही. आता खासगी ट्रॅव्हल्स कंपनीला बस थांब्यासाठी जागा मिळवून देण्यासाठी कोणी नगरसेवकाने तरी प्रयत्न केले नाहीत ना? याचीही चर्चा सुरू झाली आहे.

कदंब बसस्थानकासमोर ‘अटल सेतू’च्या खालील रिकाम्या जागेत पूर्वीप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्सचा बस थांबा निर्माण करण्यासाठी सुरवात झाली आहे. वाहतूक खात्याच्यावतीने या जागेच्या सपाटीकरणाचे व स्वच्छतेचे काम जेसीबीच्या साह्याने रविवारी सुरू करण्यात आले.

‘अटल सेतू’चे काम सुरू झाले, तेव्हापासून खासगी ट्रॅव्हल्सचा थांबा पाटोवर वाहतूक खात्याच्या मालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आला होता. त्यासाठी या ठिकाणी पेव्हर्स व डांबरीकरण करून ट्रॅव्हल्स थांब्यासाठी योग्य जागा तयारी केली होती, परंतु ‘अटल सेतू’चे काम पूर्ण झाल्याने संबंधित कंपनीने आपले साहित्यही त्या ठिकाणाहून हटविल्याने तेथे पूर्वीप्रमाणे बस थांबा सुरू करण्यात येणार आहे.

या मागे कोणाचा हात?

खासगी ट्रॅव्हल्स बस थांब्यापासून अर्ध्या किलोमीटरवर कदंब बसस्थानकाजवळ वाहतूक खात्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांना जागा दिलेली आहे. तेथून दररोज शेकडो बसगाड्या सायंकाळी परराज्यात प्रवासी घेऊन जातात. त्यात अनेक नामवंत ट्रॅव्हल्स कंपन्यांचा समावेश आहे, परंतु एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीला थांब्यासाठी पाटोवर जागा तयार करून देण्यामागे कोणाचे हात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: गोव्यात आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून 8 तारखेपर्यंत यलो अलर्ट; हवामान खात्याची माहिती

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT