Water Problem Dainik Gomantak
गोवा

कुंडई पंचायतीत पाणीप्रश्‍‍नी ठराव घेतला, कार्यवाही कुठे रखडली?

दैनिक गोमन्तक

फोंडा Ponda : कुंडई पठारावरील कर्नाटकच्या चित्रापूर मठावरून कुंडई पंचायतीच्या (Panchayat) ग्रामसभेत गदारोळ झाला. चित्रापूर मठाला पंचायतीतर्फे दिलेले परवाने त्वरित रद्द करावे, अशी जोरदार मागणी कुंडई ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. रविवारी झालेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थांबरोबरच पोलिसांनाही (Police) तैनात करण्यात आले होते.

चित्रापूर मठ कुंडई पठारावर आकार घेत आहे. मात्र, या मठाचे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा कुंडई ग्रामसभेत केला. फार्म हाऊस म्हणून सुरवातीला नोंद केलेल्या या चित्रापूर मठाचे रुपांतर आता निवासी स्वरुपात होत असल्याने कुंडई कोमुनिदादने या मठाला दिलेली जमीन स्थानिकांच्या मुळावर येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या मठाने एका कारणासाठी पंचायतीकडून परवाना मागितला आणि आता दुसरेच कारण समोर आल्याने ही फसवणूक असल्याचे रितेश नार्वेकर व इतरांनी पंचायतीच्या निदर्शनास आणले. सरकारी खात्याने जरी या मठाला परवाने दिले, तरी या मठाचे कामच बेकायदा असल्याने पंचायतीने सर्व परवाने रद्द करून मठाच्या बांधकामावर कारवाई करावी, अशी जोरदार कुंडई ग्रामसभेत मागणी केली. कुंडई पंचायतीच्या सभागृहात झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा पंचसदस्य रामू नाईक होते. इतर सर्व पंचसदस्यही यावेळी उपस्थित होते. सरपंच मोहन गावडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद (Sarpanch) रिक्त आहे. सचिव सुशांत नाईक यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला.

अपशब्‍द वापरल्‍याने तणाव

या मठाच्‍या बांधकामाविरुद्ध कारवाईसाठी पंचायत मंडळाने सहमती दाखवली आहे. मात्र, पंचायत सचिव सुशांत नाईक यांनी आपण आतापर्यंतचे परवाने तसेच कायदेशीर बाजू तपासूनच पुढील कृती करणार असल्याचे ग्रामस्थांसमोर स्पष्ट केले. ग्रामसभेच्या सुरवातीलाच एका ग्रामस्थाने अपशब्द वापरल्याने गदारोळ झाला एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार घडले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत प्रकरण मिटवले व त्यानंतर शांततेत तसेच चर्चात्मक स्थितीत ग्रामसभेचे कामकाज चालले.

पाणीप्रश्‍‍नी (Water Problem) ठराव घेतला,

कार्यवाही कुठे रखडली?

पाणीप्रश्‍‍नी ठराव घेतला,

कार्यवाही कुठे रखडली?

आरोप-प्रत्‍यारोपांच्‍या फैरी

पंचायतीचा निधी मान्यता न घेता यापूर्वी खर्च केला होता. त्यासंबंधी तक्रार दाखल केली होती, त्याचे काय झाले असा प्रश्न सुदिप कोरगावाकर यांनी केला. झाडे, झुडपे कापणीतील कामात गैरव्यवहार झाला आहे. बनावट सह्या करून पैसे उकळलेले आहेत, फोकस व वायर काहीजणांनी घरी नेली, मंदिराला घातलेल्या पत्र्याची किंमत अव्वाच्या सव्वा लावण्यात आली, असे आरोप सुदीप कोरगावकर व नरेश कोरगावकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT