Panchayat Election Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पंचायत निवडणुका 10 ऑगस्टला होणार

पंचायत संचलनालयाने अधिसूचना काढली; हायकोर्टाचा सरकारला दणका

आदित्य जोशी

पणजी : येत्या तीन दिवसांत अधिसूचना काढून 12 ऑगस्टपर्यंत पंचायतींची निवडणूक प्रक्रिया संपवावी, अशा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाने दिला होता. यावर सरकारतर्फे अधिकचा एक महिन्याचा अवधी मिळावा, अशी याचिका नव्याने न्यायालयात दाखल केली होती. कोर्टाने सरकारला कोणताही दिलासा न दिल्याने अखेर 10 ऑगस्ट रोजी पंचायत निवडणुका घेण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कोणत्याच प्रकारचा दिलासा न देता 12 ऑगस्टपर्यंत पंचायत निवडणूक प्रक्रिया संपवण्याचे निर्देश नव्याने दिल्याने सरकार बॅकफुटवर आले आहे. यामुळे पंचायत संचालकाने आज अधिसूचना काढत बुधवार 10 ऑगस्ट रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या 186 पंचायतींच्या निवडणुका इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणामुळे अडखळल्या होत्या. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याचा इरादा राज्य सरकारने करून राज्यातील 175 पंचायतींवर प्रशासक नेमले आहे. इतर अकरा पंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असतानाच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय घेताना उच्च न्यायालयाने या निवडणुका 12 ऑगस्टपर्यंत घ्याव्यात, असा निर्णय दिल्याने सरकारपुढे निवडणुका घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. यासाठी आज अधिसूचना काढण्यात येणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.

या 186 पंचायतींची होणार निवडणूक
- पेडणे - 17
- डिचोली - 17
- सत्तरी - 12
- बार्देश - 33
- तिसवाडी - 18
- फोंडा - 19
- धारबांदोडा - 5
- मुरगाव - 10
- सासष्टी - 30
- सांगे - 7
- केपे - 11
-काणकोण - 7


सरकारची लागणार कसोटी
राज्य सरकारने आज निवडणुकीची घोषणा करून निवडणूक घेण्यासंदर्भात सूचना केली आहे. या आठवड्यात निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, 11 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत विधानसभेचे पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सरकारला या अधिवेशनात नव्या योजना, घोषणा किंवा नव्या योजनांचा कार्यक्रम जाहीर करता येणार नाही. त्यामुळे अधिवेशनाबाबत सरकारला पुनर्विचार करावा लागेल, अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT