Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: बेकायदा बांधकाम, पंचायतीकडून पंचनामा

Illegal Construction: मांद्रे येथील नारोबा मंदिराशेजारी सीआरझेड कायद्याचा भंग करून उभारलेल्या बेकायदा बांधकामाचा पंचायतीने पंचनामा केला.

दैनिक गोमन्तक

Illegal Construction:

मांद्रे येथील नारोबा मंदिराशेजारी सीआरझेड कायद्याचा भंग करून उभारलेल्या बेकायदा बांधकामाचा पंचायतीने पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक, पंचायत सचिव व तक्रारदार संदेश सावंत यांची उपस्थिती होती.

यासंदर्भात सावंत आणि इतर सामाजिक संस्थांनी लेखी तक्रारी पंचायत, उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होती. गुप्ता नामक व्यक्तीने हे बांधकाम उभारले आहे. या बांधकामाचा पंचनामा केल्यानंतर अहवाल पेडणे गट विकास अधिकारी आणि वरिष्ठ पातळीवर पोहोचवला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले की, पंचायत क्षेत्रात बेकायदा बांधकामांना थारा दिला जाणार नाही. अशी बांधकामे सुरू असल्यास त्यात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पंचांनी हस्तक्षेप करून अशी कामे रोखण्याचा प्रयत्न करावा.

या बांधकामाला पंचायतीने कोणताही परवाना दिला नव्हता. स्थानिकांनी देखील बेकायदा बांधकामे करू नये, असे ते म्हणाले. तक्रारदार संदेश सावंत यांनी पंचायतीने बेकायदा बांधकामाचा पंचनामा केल्याने समाधान व्यक्त केले.

रस्त्याच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या अशा बांधकामांकडे सार्वजनिक बांधकाम खाते व अन्य विभागांनी लक्ष द्यायला हवे. तसेच बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT