Panaji Crime  Dainik Gomantak
गोवा

पणजीतील 'त्या' युवकाची मृत्युशी झुंज अपयशी; 3 महिन्यांपुर्वी झाली होती बेदम मारहाण

रूग्णालयात सुरू होते उपचार; मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

Akshay Nirmale

गोव्यातील एका युवकाला फेब्रुवारी महिन्यात बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण, त्याची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आहे. तीन महिन्यांनंतर अखेर रूग्णालयात निधन झाले. सर्वसामान्य कुटूंबातील या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

या प्रकरणी डॉक्टरांच्या सर्टिफिकेटसह लवकरच पोलिसांची भेट घेणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

(Goan youth beaten up before 3 months eventually died)

19 फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास ही मारहाणीची घटना झाली होती. या मारहाणीत त्याला डोक्यावर जखम झाली होती. तथापि, सिटी स्कॅनमध्ये काही आढळून आले नव्हते. पण एमआरआय स्कॅनमध्ये डोक्यात मारहाण झाल्याचे तसेच मेंदूत पस झाल्याचे निदर्शनास आले. संसर्ग पसरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

जीएमसीमध्ये त्याला दाखल केले होते. त्याला मारहाण करणारे लोक आगशी येथील होते. पोलिसांकडे या मारहाणीचे व्हिडिओ फुटेज आहे, असे स्थानिकांनी सांगितले.

तो मुलगा एका बुलेट बाईकवर हात ठेऊन उभा होता. ती बुलेट पडली. त्यामुळे त्या मुलाला मारहाण करण्यात आली. नुकसान भरून देतो, असे सांगुनही त्याचे कुणी ऐकले नाही. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

दरम्यान, टोंक परिसरातील नागरिक आणि या तरूणाच्या नातेवाईकांनी त्याला मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT