Panaji Traffic Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic: महोत्‍सवांच्‍या 'राजधानी'ला वाहतूक कोंडीचे ग्रहण! सेरेंडिपीटी, फेस्‍ताच्‍या फेरीमुळे सुट्टीच्‍या दिवशी प्रचंड गर्दी; वाहनांच्‍या लांबच लांब रांगा

Parking Problems In Panaji: राजधानी पणजी ही ‘महोत्‍सवनगरी’ बनत चालली आहे. विशेष म्‍हणजे ही जितकी दिलासादायी बाब आहे, तितकेच बेशिस्‍त पार्किंग व त्‍यामुळे सातत्‍याने होणाऱ्या वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राजधानी पणजी ही ‘महोत्‍सवनगरी’ बनत चालली आहे. विशेष म्‍हणजे ही जितकी दिलासादायी बाब आहे, तितकेच बेशिस्‍त पार्किंग व त्‍यामुळे सातत्‍याने होणाऱ्या वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.

रविवारी सायंकाळी राजधानीतील जुन्‍या गोमेकॉसमोरील रस्‍ता, आयनॉक्‍स परिसर तसेच पुढे मिरामार मार्गावर बराच काळ वाहनांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या. कुर्मगतीने वाहने पुढे जात होती. विशेष म्‍हणजे वाहतूक पोलिस कुठेच दिसत नव्‍हते.

पणजीतील (Panaji) फेस्‍त फेरीमुळे अनेक वाहने मांडवीरीती दाखल होतात. दुचाकी, चारचाकी बेलगाम पार्क केल्‍या जातात. परिणामी वाहतूक मार्गिका ठप्‍प होतात. महापालिकेने याप्रश्‍‍नी तातडीने बैठक बोलावून वाहतूक पोलिसांचे कायमस्वरूपी साहाय्‍य मिळेल, असे प्रयोजन करणे अपेक्षित आहे. जगविख्‍यात सेरेंडिपीटी महोत्‍सव राजधानी पणजीत सुरू आहे. जागतिक पातळीवरील कलाकार व त्‍यांचे प्रकल्‍प पाहण्‍यास मोठ्या संख्‍येने रसिक येत आहेत. त्‍यांनाही वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.

पुलिस के बाप को बताओ...

जुने गोमेकॉसमोर सेरेंडिपीटी महोत्सवातील पाहुण्यांना नेण्यासाठी आलेल्या एका टॅक्सीवाल्याने रस्त्याच्या मधोमध वाहन उभे केले होते. वाहन बाजूला उभे करा, असे सांगितल्यावर या टॅक्सीचालकाचा तोरा वाढला. ‘‘मै टॅक्सी नही निकालूंगा...आप पुलिस के बाप को बताओ’’ अशी भाषा तो वापरत होता. टॅक्सीचा क्रमांक जीए ०४ टी ५१२५ असा असून या टॅक्सीचालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली.

लांब दूरवर कोठेच दिसेनात वाहतूक पोलिस

रविवार असल्याने पणजीत पर्यटकांची (Tourists) गर्दी झाली होती. त्‍यातच फेस्‍ताची फेरी आणि सेरेडिपीटी महोत्सवासाठी आलेल्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. लोक मनाला वाट्टेल तेथे गाड्या उभे करत होते. त्यामुळे त्याचा इतरांना प्रचंड त्रास झाला. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जवळपास तीन किलोमीटरच्या परिसरात एकही वाहतूक पोलिस तैनात नव्हता. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्‍‍नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहतूक पोलिस नसल्‍यामुळेच या वाहतुकीच्‍या कोंडीत आणखी भर पडत आहे, असे काही लोकांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

क्रिकेट विश्वावर शोककळा! रणजी क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर छातीत दुखू लागले अन्...

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

SCROLL FOR NEXT