झाडांच्या रोपांचे रोपण  goa digital team
गोवा

Panaji : जागतिक पर्यावरण दिन मांद्रे येथे साजरा

वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचे काम झाडांना पाणी देऊन करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : विद्याप्रबोधिनी वाणिज्य, शिक्षण, संगणक आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचा निसर्ग क्लब आणि धवरूख संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन मांद्रे येथे साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध फळझाडे, फुलझाडे व पर्यावरण पूरक अशा झाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. धवरुख संस्थेबरोबरच विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या पर्यावरणप्रेमी सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला.

धवरुख संस्थेच्या माध्यमातून या संस्थेचे अध्यक्ष व साहाय्यक प्राध्यापक रुद्रेश म्हामल आणि सदस्य हे गेली सात वर्षे अविरतपणे पर्यावरण संवर्धनाचे काम करीत आहेत. याप्रसंगी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचे काम झाडांना पाणी देऊन करण्यात आले. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुमारे २००० रोपट्यांचे रोपण करण्याचे उद्दिष्ट हे पूर्ण करण्यात येईल.

या पर्यावरणदिनाअंतर्गत या क्षेत्रातील स्वच्छतेचा उपक्रमही हाती घेण्यात आला. त्यामध्ये त्यांनी पूर्ण भागातील विविध प्रकारचा कचरा, काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्याचे मोठे काम केले.

या उपक्रमात विविध माजी विद्यार्थी संघ तसेच आजी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी महाविद्यालयातील निसर्ग क्लबचे समन्वयक डॉ. उद्धव पोळ, साहाय्यक प्राध्यापक कालिदास म्हामल, साहाय्यक प्राध्यापिका रिचा चिमुलकर, गौरीश बगळी तसेच धवरुख संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT