Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पणजी महिला पोलिस स्थानकात बदली अधिकारी मिळेना

Goa Police: महिला पोलिस स्थानक: दोन उपनिरीक्षक रजेवर; निरीक्षकांवर ताण

दैनिक गोमन्तक

Goa Police: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पणजी महिला पोलिस स्थानकात त्याची संख्या वाढत आहे. मात्र प्रकरणांच्या तपासकामासाठी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ या पोलिस स्थानकात नसल्याने निरीक्षकांना एकहाती लढा द्यावा लागत आहे.

या पोलिस स्थानकात असलेल्या दोन महिला उपनिरीक्षक या रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या बदली कर्मचारी देण्यात न आल्याने पोलिस निरीक्षकांवर कामाचा ताण पडत आहे.

पणजीतील महिला पोलिस स्थानकात एका पोलिस निरीक्षकासह दोन उपनिरीक्षक तसेच दहा महिला कॉन्स्टेबल्स आहेत. महिलांवरील अत्याचार तसेच कौटुंबिक समस्यासंदर्बातची प्रकरणे ही महिला पोलिस स्थानकात येतात. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करून त्यावर निर्णय घेण्यातच अधिकाऱ्यांचा वेळ जात असतो.

न्यायालयातील खटल्यांवरील सुनावणीवेळी उपस्थिती लावणे, गुन्हा नोंद असलेल्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जबान्या नोंदवणे, पुरावे जमा करणे तसेच संशयिताच्या जामिनावरील अर्जाला उत्तरे सादर करणे, अशा अनेक कामांमुळे महिला पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांना तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.

एकमेव निरीक्षक; त्यावरच वाढता भार

महिला पोलिस स्थानकात महिलांवरील बलात्कार व लैंगिक अत्याचाराची तसेच अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण यासंदर्भातचे गुन्हे नोंद होऊन तपासकाम सुरू आहे. या स्थानकातील दोन उपनिरीक्षकांकडे असलेल्या प्रकरणांचे तपासकाम त्या आजारपणाच्या रजेवर गेल्याने रखडले आहे. त्या प्रकरणांचा भार आता एकमेव पोलिस निरीक्षकावर पडला आहे.

उपनिरीक्षक किंवा निरीक्षक पदावरील अधिकारीच या प्रकरणांचा तपास करू शकतो, त्यामुळे या उपनिरीक्षकांकडे असलेल्या प्रकरणांचे तपासकाम करण्यासाठी अधिकारीच नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बदली अधिकारी देण्याकडे दुर्लक्ष

या स्थानकात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आहे. मात्र, बदली पोलिस अधिकारी देण्याबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत. या पोलिस स्थानकासाठी एकच वाहन असल्याने तपासकामातही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम तपासकामावर होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT