Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : भूमिगत वीजवाहिन्‍या म्‍हणजे महाघोटाळा; ‘आप’चा आरोप

Panaji News : ‘आयएसआय’ मार्क नसलेल्या केबल्‍सचा वापर

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, वीज खात्यातर्फे म्हापसा शहरात भूमिगत वीजवाहिन्‍या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी निवडलेल्या पाच कंपन्यांची पॉवर केबल न वापरता ‘डायनॅमिक'' कंपनीची पॉवर केबल वापरली आहे. ‘आयएसआय’ मार्क नसलेली केबल का वापरली, याचे उत्तर वीजमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने आज करण्यात आली.

येथील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला वाल्मिकी नाईक, सलमान खान आणि सुनील सिंग्नापूरकर यांची उपस्थिती होती.

घरोघरी केबल कनेक्शन देताना त्‍यासाठी जी आवश्‍यक खोली गरजेची आहे, ती न ठेवता केवळ पाच इंच खोदकाम करून केबल दिली आहे. ती अत्यंत धोकादायक आहे. पावसात या केबल उघड्या पडू शकतात आणि खराबही होऊ शकतात, असे खान म्हणाले. वीजजोडण्या देताना वीज खात्याच्‍या कर्मचाऱ्यांनी किंवा अभियंत्यांनी का पाहणी केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

वीज फिडरचे आर्थिंग दिले गेले नाहीत. फिडरच्या जागी एक आर्थिंगचे पीट करण्यासाठी पाच हजारांचा खर्च येतो. एका फिडरसाठी दोन पीट लागतात. ते पीट घालण्यात आले नाही. त्‍याचे पैसे कुठे गेले? असा सवाल खान यांनी केला.

राजस्‍थानींशी एवढी मैत्री का?

वीज खात्याच्या वतीने ५ हजार कोटींच्‍या भूमिगत वीजवाहिन्‍या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डायनॅमिक कंपनी ही राजस्थानची असून, कंत्राटदारही राजस्थानचाच आहे. तेथील लोकांशी एवढी मैत्री कशासाठी, हे मंत्री ढवळीकर यांनी सांगावे, अशी मागणी नाईक यांनी केली.

चाचण्या घेऊनच केला वापर

भूमिगत वीजवाहिन्‍या टाकण्यासाठी जे साहित्य वापरण्यात आले आहे, त्याची सर्व चाचणी करूनच तसेच मान्यताप्राप्‍त व प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांच्याच केबल्‍स आणल्या आहेत. कोणी हवेत बाण मारू नयेत, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपचा पराभव करण्यासाठीच गोवा फर्स्ट'; विजय सरदेसाईंचा काँग्रेसलाही टोला, 'आमचे लक्ष्य फातोर्डा नव्हे, गोवा'

Goa Politics: ओवैसींच्या गोवा नागरी कायद्यावरील दाव्यांना भाजपचा आक्षेप; यतीश नाईक म्हणाले, 'कायदा धर्म-जात न पाहता सर्वांसाठी समान'

Dog Attack Viral Video: 6 महिन्यांच्या बाळावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, आत्यानं वाचवला चिमुरडीचा जीव; अंगावर काटा आणणारा थरार व्हायरल!

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

SCROLL FOR NEXT