Panaji smart city mission Dainik Gomantak
गोवा

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत गोव्यातील 'या' शहराला मिळणार 73.38 कोटी

हा प्रकल्प 18 महिन्यात होणार पूर्ण

दैनिक गोमन्तक

गोव्याची राजधानी पणजीला स्मार्ट सिटी मिशन प्रकल्पाअंतर्गत दीड वर्षात रु. 73.38 कोटी किमतीचा युनिव्हर्सल वॉकवे मिळणार आहे. इमेज पणजी (Panaji) स्मार्ट सिटी (smart city) डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) ने प्रकल्पासाठी पात्र कंत्राटदार आणि एजन्सी यांच्याकडून अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) आधारावर सिंगल स्टेज टू पार्ट बिड सिस्टम अंतर्गत ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

युनिव्हर्सल वॉकवेज प्रकल्पात रस्त्यांची कामे, शहराची सुशोभीकरणाची कामे, सांडपाणी निवारण योजना आणि लाइट योजना यासह 8.58 कोटी हे स्ट्रीटस्केप डिझाइन या योजनेवर खर्च करण्यात येणार आहेत. यात वेगवेगळ्या सिंबॉलच्या माध्यमातून अनेक माहितीपर चित्रांचे रेखाटन केले जाणार आहे. हा प्रकल्प 18 महिन्यांत पूर्ण होणे आवश्यक आहे, असे निविदा दस्तऐवजात नमूद केले आहे.

73,38,09,867 रु.च्या प्रकल्पाच्या (Project) व्याप्तीमध्ये रस्त्याचे सर्वेक्षण, तपासणी, डिझाइन आणि बांधकाम यांचा समावेश आहे, ज्यात पादचारी मार्गांचा पुनर्विकास, सांडपाणी सिस्टीम, रस्त्यावरील कचरा यासारख्या समस्यांचा या योजनेत समावेश आहे. तसेच पणजी शहरातील विविध ठिकाणचे बगीचे ऐतिहासिक वास्तु यांच जतन देखील या प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Crime: 'पोलिस नक्की कुणाला संरक्षण देतात'? मोरजी खून प्रकरण; आप, कूळ-मुंडकार मुख्य संशयिताच्या अटकेसाठी आक्रमक

Edberg Pereira Case: 'एडबर्ग' मारहाण प्रकरणाचे गूढ वाढले! शिस्तभगांची कारवाई झालेला हवालदार आजारी सुट्टीवर; चर्चांना उधाण

मटका म्हणजे काय? पुराव्यांअभावी मडगाव कोर्टाकडून संशयिताची निर्दोष सुटका

Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

Goa Today's News Live: कचरा कामगार वेतन घोटाळा! सांताक्रूझ ग्रामपंचायतीचा सरकारी सेवक आणि पंच सदस्याविरुद्ध ACB कडून FIR दाखल

SCROLL FOR NEXT