MLA Rudolph Fernandes  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

Panaji News : लवकरच तीनशेहून अधिक विकासकामांना चालना

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, सांताक्रुझ मतदारसंघात सध्या पणजी ते सांताक्रुझ या प्रमुख रस्त्याचे फोर पिलरपासून डांबरीकरण करण्यात आलेले आहे.

आणखी तीनशेच्यावर विकासकामे मार्गी लागतील, तेव्हा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला असेल, अशी माहिती आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी दिली.

फुटबॉल मैदानाच्या बाजूला असलेली जागा पेव्हर्सच्या साह्याने आच्छादित करण्यात येणार आहे. पेव्हर्स घातल्यानंतर माती वाहून रस्त्यावर जात नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या व्यायामाच्या ठिकाणाची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आहे.

याशिवाय फोर पिलर्सच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने सध्या पेव्हर्स बसवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय चारखांबेपासून रस्त्याच्या एका बाजूने पदपथ आहे, आता दुसऱ्या बाजूनेही पदपथाचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय मुख्य रस्त्याच्या बाजूने गेलेली जलवाहिनी पोर्तुगीज काळातील आहे.

त्यामुळे नव्याने जोडण्या देणे शक्य नाही, यासाठी नव्याने वाहिनी टाकावी लागणार आहे. वाहिनी टाकण्याची निविदा प्रक्रियाही झाली आहे, केव्हाही कंत्राटदार काम करू शकतो.

परंतु नुकताच डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा खोदावा लागणार यासाठी ड्रिलिंग करून रस्त्याच्या बाजूने भूमिगत वाहिनी नेण्याचे काम करावे लागेल, असे दिसते. परिसरात अनेक ठिकाणी मुख्य नळाला मोटार लावतात, त्यामुळे आजूबाजूच्या नळाला पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

फोर पिलर्सचा इतिहास लिखित स्वरूपात !

फोर पिलर्सच्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याठिकाणी फोर पिलरचा (चार खांबे) इतिहास लिहिला जाणार आहे. प्रजल साखरदांडे व इतर इतिहास अभ्यासकांनी आपली भेट घेतली होती. चार खांबे या ठिकाणाचा इतिहास रंजक आहे, तो अऱ्या अर्थाने सर्वांसमोर यावा, त्यांनी तो इतिहास लिखित स्वरूपात आणण्याचे ठरविले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मदतीने कामे मार्गी

मतदारसंघात तीनशेच्या आसपास कामे झाल्यानंतर बराच कायापालट दिसेल. सांताक्रूझ मतदारसंघ विकासात मागे पडला आहे, हे सर्वांना माहीत आहे. परंतु आता सर्व कामे मार्गी लागल्यास जनतेच्या समस्या कमी होतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने ही कामे मार्गी लागली आहेत, असेही आमदार रुडाल्फ यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT