Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : सर्वसमावेशकतेसाठी महिलांच्या कार्यकुशलतेसाठी प्रयत्न: गुरुप्रसाद पावसकर

Panaji News : दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे महिला दिन साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, महिलावर्गांकडून नेहमीच उत्साहाने आणि नेमकेपणाने कार्य होते. त्यामुळेच त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

म्हणूनच सर्वसमावेशकता आणण्याच्या ध्यासातून प्रत्येक स्त्रीला सक्षम आणि कार्यकुशल करण्याचा आणि त्या माध्यमातून समाजामध्ये वैविध्यता आणि समानता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, असे मत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी व्यक्त केले.

गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएरा आणि डिसेबिलिटी अलायन्स फॉर इन्क्लुझिव्ह गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्वरी येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनमध्ये आतंरराष्ट्रीय महिला दिन-२०२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी केलेल्या दिव्यांग महिलांचा सन्मान करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या म्हणून गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका मेघना शेटगांवकर उपस्थित होत्या. राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, डिसेबिलिटी अलायन्स फॉर इन्क्लुझिव्ह गोवाचे अध्यक्ष पॅट्रिक डिसोझा, राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा व पॅरा खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू साक्षी काळे आणि रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएराचे अध्यक्ष डेन्झिल झेवियर यांची उपस्थिती होती.

पर्सी कार्दोझो यांनी मानसिक व शारीरिक आरोग्य आणि महिलांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. तस्मिया शेख यांच्या आभार मानले.

कर्तबगारांचा गौरव

गोवा राज्य जनगणना संचालनालयामध्ये सांख्यिकी प्रक्रिया सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या रत्ना मोरे, गोवा राज्य राजभाषा संचालनालयामध्ये लेखापाल म्हणून काम करणाऱ्या निकिता कुट्टीकर (दोघी लोकोमोटर डिसॅबिलिटीची समस्या असलेल्या दिव्यांग व्यक्ती),

पणजीतील दिवाणी न्यायालयात निम्न विभागीय कारकून म्हणून कार्यरत संपदा नाईक (दृष्टिदोष असलेली व्यक्ती), गोवा राज्य अंध राष्ट्रीय संघटनेमध्ये संगणक व संगीत शिक्षिका रेशा वेर्णेकर (दृष्टिदोष), पर्वरीतील संजय स्कूलमधील शिक्षिका रिषिता रायकर (श्रवणदोष) आणि फॅशन डिझायनर सादिया बांदोडकर (श्रवणदोष) यांना यावेळी गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT