Smart City Work  Dainik Gomantak
गोवा

Smart City Work : ‘स्मार्ट’ कामांचा बोजवारा! कंत्राटदार अडचणीत

Smart City Work : ताड-माड मंदिरासमोरचे खचले गटार

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City Work :

पणजी, सांतिनेजमधील काकुलो मॉलजवळील ताड-माड मंदिर म्हणून परिचित असलेल्या ठिकाणासमोरील केलेले गटाराचे काम भुसभूशीत मातीमुळे खचले. दहाच्या सुमारास ही घटना घडली. मंदिरासमोर चेंबर उभारणीसाठी खोदकाम केले आहे. तिथे गटार कोसळल्याने ‘स्मार्ट सिटी’ कामाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

गटार खचल्याची माहिती मिळताच महापौर रोहित मोन्सेरात व उपमहापौर संजीव नाईक, महिला नगरसेवक वर्षा शेट्ये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महापौर मोन्सेरात म्हणाले, मंदिराच्या बांधकामाला धोका दिसत आहे. कंत्राटदारास आपण मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी सूचना करू.

सकाळी पावणे दहाच्या सुमारास गटार खचल्याने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लोकांनी तत्काळ मंदिरापासून बाजूला पळ काढला. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) अभियंत्यांनीही घटनास्थळी भेट दिली.

या खड्ड्यात साचलेली पाणी उपसा करून जेसीबीच्या साह्याने माती काढण्याचे काम सुरू होते. पाऊस सुरू असला तरी कामे आयपीएससीडीएल-कंत्राटदाराची चौकशी करा

सांतिनेजमधील गटार खचल्याची घटना घडली, त्यातून त्या कामाचा दर्जा दिसून येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT