Smart City Road  Dainik Gomantak
गोवा

Smart City Road : पूर्वसूचनाच नसल्याने नागरिकांची तारांबळ; वाहतुकीवर परिणाम

Smart City Road : स्मार्ट सिटीच्या विविध कामांसाठी कंत्राटदार नेमले आहेत. पणजीतून आल्तिनोवरील मार्गावरून भाटले, ताळगाव, सांताक्रूझ परिसरात दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे शनिवारी वाहनचालकांची तारांबळ उडाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City Road :

पणजी, स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. अजूनही सांतिनेज परिसरातील वाहिनी आणि चेंबरचे काम पूर्ण झालेले नाही. तोच आता आल्तिनो टेकडी परिसरात वाहिनीसाठी भूमिगत खोदकाम सुरू केले आहे.

त्यामुळे आल्तिनोवरून भाटलेत जाणाऱ्या वाहनांना हा मार्ग बंद झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता खोदल्याने पणजीवासीयांना पुन्हा कंत्राटदारांनी गृहीत धरले की काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रकारही घडला.

स्मार्ट सिटीच्या विविध कामांसाठी कंत्राटदार नेमले आहेत. पणजीतून आल्तिनोवरील मार्गावरून भाटले, ताळगाव, सांताक्रूझ परिसरात दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे शनिवारी वाहनचालकांची तारांबळ उडाली.

नागरिकांना गृहीत धरूनच काम? ः स्मार्ट सिटीची कामे नागरिकांना गृहीत धरून करतात की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ज्या प्रभागात काम करायचे आहे, तेथील नगरसेवकालाही कामांची माहिती नसते.

त्यामुळे नगरसेवकांना त्रस्त नागरिकांच्या शिव्या खाव्या लागतात. या कामांविषयी दोन-तीन दिवस अगोदर जनजागृती केली जात नाही. त्यामुळेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

चारचाकी वाहनधारक त्रस्त

भाटले, सांताक्रूझ, ताळगावातील जे चारचाकी वाहनधारक पणजीत येण्यासाठी रोज आल्तिनोवरील या मार्गाचा अवलंब करतात, त्यांना तांबडीमाती, मधुबन कॉलनी, बालगणेश, कला अकादमी असा मार्ग स्वीकारावा लागला.

शिवाय पणजीतून भाटले, सांताक्रूझ किंवा ताळगाव परिसरात जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना मळ्यातून किंवा कला अकादमी, बालगणेश, मधुबन कॉलनी, तांबडीमाती असा प्रवास करावा लागला. रस्ता बंद झाला असला तरी दुचाकीस्वारांना मात्र एकेरी वाहतूक करता येईल, एवढी जागा असल्याने ते या मार्गाचा वापर करताना दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT