Panaji Smart City Rs 146 crore Dainik Gomantak
गोवा

सायकल ट्रॅकसह रस्त्यांसाठी 146 कोटी खर्च; केंद्रीय मंत्री तोखन साहू यांनी दिली राज्‍यसभेत माहिती

Panaji Smart City Rs 146 crore: स्‍मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत राजधानी पणजीत सायकल ट्रॅकसह रस्‍त्‍यांच्‍या कामांसाठी १४६ कोटी रुपये खर्च करण्‍यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांनी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: स्‍मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत राजधानी पणजीत सायकल ट्रॅकसह रस्‍त्‍यांच्‍या कामांसाठी १४६ कोटी रुपये खर्च करण्‍यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

केंद्र सरकारने गोव्‍यातील पणजीचा स्‍मार्ट सिटी प्रकल्‍पात समावेश केला. त्‍यानंतर या उपक्रमाअंतर्गत मिळालेल्‍या निधीचा वापर रस्त्यांची सुधारणा, रस्ते रुंदीकरण पदपथ, सायकल ट्रॅक, युटिलिटी कॉरिडॉर, विद्युत, पाणीपुरवठा, सांडपाणी व्‍यवस्‍थापन आदींसारख्‍या कामांसाठी करण्‍यात आला. अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम (ईपीसी) अंतर्गत ही कामे करण्‍यात आली.

पहिल्‍या टप्‍प्‍यात या कामांसाठी ८० कोटी रुपये खर्च करण्‍यात आले. तर, दुसऱ्या टप्‍प्‍यात या कामांवर ६६ कोटींचा खर्च करण्‍यात आला, असे मंत्री साहू यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

दरम्‍यान, रस्ते व पूल आणि शहरी वाहतूक यांसारखे शहरी नियोजनाचे विषय प्रामुख्याने संबंधित राज्य सरकारे, शहरी स्थानिक संस्था आणि नगरविकास प्राधिकरणे यांच्या अधिकारक्षेत्रात येतात. सायकलिंगसाठीच्या पायाभूत सुविधांसह मोटर-विरहित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी धोरणात्मक आराखडे, सल्लागार सूचना आणि आदर्श मार्गदर्शक तत्त्वे जारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT