E Bus Canva
गोवा

Panaji E- Bus: पणजीत पुन्हा सुरु होणार कदंबची कॅशलेस ई- बस; पहिल्या टप्प्यात सात मार्गांवर मिळणार सेवा

Panaji Smart City: राजधानीत विजेवरील बससेवा मागील आठवड्यात कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कदंब वाहतूक महामंडळाने ही सेवा पुढे ढकलली होती. आता ही बससेवा गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba EV Cashless Bus Service

पणजी: राजधानीत विजेवरील बससेवा मागील आठवड्यात कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कदंब वाहतूक महामंडळाने ही सेवा पुढे ढकलली होती. आता ही बससेवा गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ७ मार्गांवरील बससेवा कॅशलेस होणार आहे.

कॅशलेस सेवेसाठी स्मार्ट ट्रान्झिट कार्ड अनिवार्य आहे. कार्ड नसेल तर यूपीआयच्या माध्यमातूनही तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट कार्ड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती कायमची सुरूच राहणार आहे. तसेच कार्ड नसलेल्या प्रवाशांना यूपीआयद्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि कदंब वाहतूक महामंडळाने एकत्रितपणे शहरातील काही विजेवर चालणाऱ्या बससेवा कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्मार्ट ट्रान्झिट कार्डला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय काहीसा पुढे ढकलण्यात आला होता, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.

''टूमोक'' या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने क्यूआर कोडद्वारे तिकीट बुकिंगची सोयही उपलब्ध आहे. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अ‍ॅपद्वारे बसचे रिअल-टाइम ट्रेकिंग, क्यूआर कोड आधारित तिकीट बुकिंग आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल. विजेवर चालणाऱ्या बस सेवा कंडक्टरशिवाय चालवणे हे पणजी स्मार्ट सिटीचे लक्ष्य असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT