Panaji  Dainik Gomantak
गोवा

रस्त्यांवर खड्डे, पाण्याचीही समस्या, पणजीकर त्रस्त

पणजीत पार्किंग समस्या, ओला कचरा व्यवस्थापन स्थळाचा अभाव, खराब रस्ते, अशा अनेक समस्या आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: येथील रहिवाशांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पणजी हे विकसित शहर मानले जात असले तरी येथे पार्किंग समस्या, ओला कचरा व्यवस्थापन स्थळाचा अभाव, खराब रस्ते, अशा अनेक समस्या आहेत. (Panaji Goa Latest News)

"पणजीचा मतदार म्हणून ही माझी दुसरी विधानसभा निवडणूक आहे. पण कचरा, पूर यासारख्या समस्या माझ्या लहानपणापासूनच आहेत. मी माझ्या वडिलांना या समस्यांबद्दल बोलताना ऐकले आहे," असे पणजीतील एक नागरिक म्हणाले.

शहरात मुसरधार पाऊस पडल्यावर मिरामारकडे जाणारा रस्ता, पोलिस (Police) मुख्यालयाबाहेरील रस्ता, बसस्थानक (Bus stand) यासारखे काही भाग जलमय होतात. यामुळे पावसाळ्यात लोकांना वाहतूक करण्यास त्रास होतो. “पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शहरातील नाल्यांची पुनर्बांधणी करणे हाच एकमेव उपाय आहे,” असे तज्ज्ञांचे मत आहे.

कचऱ्याची (Garbage) समस्या दूर करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. “कचऱ्याच्या समस्येकडे हळू हळू लक्ष दिले जात आहे पण आम्हाला कायमस्वरूपी उपाय हवा आहे, जेणेकरून आम्हाला रस्त्याच्या कडेला, बाजाराच्या भागात, निवासी भागात कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत," असे नागरिकांचे म्हणणे आहे.

रहिवासी कसिनोवर खूश नाहीत. “आम्ही कसिनो (Casino) संस्कृतीला कडाडून विरोध करत आहोत. कसिनो हे ट्रॅफिक जाम, बेकायदेशीर पार्किंग, गर्दीसाठी कारणीभूत आहे, असे देखील नागरिक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT