Goa Winter Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Winter Weather: गोव्यात थंडीची चाहूल! पणजीचे किमान तापमान 20 अंशांवर, पहाटे आणि रात्री गारवा; दुपारी मात्र उन्हाचा तडाखा कायम

Panaji Temperature 20.4 Degrees: गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी पणजीत किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मान्सूनोत्तर पाऊस ओसरल्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी पणजीत किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.२ अंशांनी कमी होते. त्यामुळे पहाटे आणि रात्री गारवा जाणवत आहे. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा कायम आहे.

गुरुवारी दुपारी कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशांनी जास्त होते. सकाळी आणि रात्री सौम्य थंडी, तर दुपारी उष्णता अशा संमिश्र वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी थंडीत वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्यावी. तसेच, दुपारच्या उष्णतेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहाटे धुके आणि दव

पणजीसह राज्याच्या विविध भागांत पहाटे धुके आणि दव पडत असून, थंडीचा अनुभव येत आहे. सत्तरी आणि डिचोली परिसरासह घाटालगतच्या भागांत पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. पुढील दोन ते तीन दिवस कमाल व किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नसून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drug Seizure: उत्तर गोव्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; 1.92 कोटींचा साठा जप्त, 94 जणांना अटक

Dhenlo Festival: धेणलो, गोरवा पाडवो अन् बलिप्रतिपदेचा अनोखा संगम! गोव्याच्या मातीत रुजलेल्या परंपरेतून अनुभवायला मिळतो संस्कृतीचा सुगंध

'FC Goa'च्या गोटात मोठी उलथापालथ! मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांची एक्झिट, क्लबने पोस्ट करत दिली माहिती

Heart Touching Bhaubeej Story: केस पांढरे झाले, तांदूळ डोक्यावरून घरंगळू लागले; पण भाऊ-बहिणीचं प्रेम आजही तसंच! भाऊबीजेच्या आठवणींनी मन भरून येईल

Government Employees: सरकारी खुर्ची आरामासाठी नाही, जनतेची कामं करण्यासाठी! कामचुकार कर्मचाऱ्यांना आता तंबी नव्हे, कारवाईचा दणका द्या

SCROLL FOR NEXT