Sonam Wangchuk Support March Goa Dainik Gomantak
गोवा

Panaji Protest Sonam Wangchuk: पणजीत घुमले 'इन्कलाब'चे नारे, 'जेन झी'ची एकजूट; सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोर्चा

Sonam Wangchuk Support March Goa: राजधानी पणजीतील मिरामार सर्कलपाशी सायं. ६ वा. राज्यातील विविध भागांतील तसेच देशातील इतर काही राज्यांतून आलेल्या तरुणाईसोबत काही नागरिक एकवटायला सुरवात झाली व शेकडोंचा जमाव हजारोंचा झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राजधानी पणजीतील मिरामार सर्कलपाशी सायं. ६ वा. राज्यातील विविध भागांतील तसेच देशातील इतर काही राज्यांतून आलेल्या तरुणाईसोबत काही नागरिक एकवटायला सुरवात झाली व शेकडोंचा जमाव हजारोंचा झाला.

‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’चे नारे यावेळी घुमू लागले. या जमलेल्या तरुणाईला ‘उजवाड’ या ‘एनजीओ’च्या कार्यकर्त्यांनी आमंत्रित केले होते.

समाजकार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, देशाची शिक्षण व्यवस्था सुधारावी, या मागणीसाठी नागरिक जमले होते. हातात मेणबत्ती आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा देत रस्त्याच्या एकाबाजूने आझाद मैदान गाठले. आझाद मैदानावर हजारो मेणबत्त्या आणि मोबाईलच्या टॉर्च पेटवत तरुणाईने सोनम वांगचुक यांना समर्थन दर्शविले.

दरम्यान, मोर्चाला समर्थन देण्यासाठी आमदार वीरेश बोरकर, ‘आप’चे गोवा प्रमुख वाल्मिकी नाईक, ॲड. हृदयनाथ शिरोडकर, प्रसाद म्हांबरे, रामा काणकोणकर, राजदीप नाईक व इतर सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘उजवाड’ काय करते?

‘उजवाड’ ही संस्था समाजिक आणि पर्यावरणसंबंधी कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेत एकूण ३० सभासद सक्रियपणे काम करतात. या संस्थेच्या अध्यक्ष सँड्रा परेरा असून सचिव अमरीन शेख आहेत. संस्थेने आपल्या सोशल मीडिया पेजद्वारे तरुणाईला हाक देऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

ऐनवेळी नाकारली परवानगी!

या मोर्चासाठी आयोजकांनी संबंधित प्रशासनाकडून परवानगी मागितलेली होती. त्यांना परवानगीही देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही परवानगी नाकारण्यात आली; पंरतु ‘उजवाड’ संस्थेने मोर्चा काढला. हजारोंच्या जमावाला आवरणे पोलिसांनादेखील शक्य नव्हते. हा मोर्चा इतक्या नियोनबद्ध पद्धतीने आयोजित केला होता की एवढा जमाव असूनही कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाले नाही. मोजक्याच वक्त्यांनी भाषणे केली, मेणबत्ती पेटवल्या आणि राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT