Babush Monserrate |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate : पोलिस उपअधीक्षक साक्षीसाठी गैरहजर

पणजी पोलिस स्थानक तोडफोड प्रकरण : सुनावणी पुन्हा तहकूब

गोमन्तक डिजिटल टीम

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांचा कथित सहभाग असलेल्या आणि 2008 साली अत्यंत गाजलेल्या पणजी पोलिस स्थानक तोडफोड प्रकरणी आज ठेवलेल्या सुनावणीस पणजी पोलिस स्थानकाचे तत्कालिन पोलिस निरीक्षक आणि सध्याचे उपअधीक्षक सुदेश नाईक हे साक्ष देण्यासाठी गैरहजर राहिल्याने ही सुनावणी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली.

मोन्सेरात यांच्या काही समर्थकांना पणजी पोलिसांनी अटक केल्यावर त्यांना सोडविण्याची मागणी करण्यासाठी मोन्सेरात आणि त्यांचे समर्थक पोलिस स्थानकावर चाल करून आले होते. त्यावेळी या जमावाने पोलिसांवर हल्ला करून स्थानकाची मोडतोड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हा हल्ला झाला त्यावेळी नाईक हे पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक होते. त्यामुळे त्यांची महत्वाची साक्ष आज होणार होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत 2008 साली तत्कालिन आमदार बाबूश मोन्सेरात हे वारंवार पणजी पोलिसांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याने पोलिस आणि त्यांचे संबंध ताणले होते, अशी साक्ष दिली होती.

दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. विधानसभेचे अधिवेशन चालू असल्याने मंत्री मोन्सेरात व त्यांची आमदार पत्नी जेनिफर हे दोघेही सुनावणीस गैरहजर होते. माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज व उदय मडकईकर हेही यावेळी उपस्थित नव्हते.

वीज बिल घोटाळाप्रकरणी साक्ष नोंद

दरम्यान, १९९८ साली घडलेल्या आणि सध्याचे पंचायतमंत्री आणि तत्कालिन वीजमंत्री माविन गुदिन्हो यांचा सहभाग असलेल्या ४.५२ कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणी न्या. आगा यांनी एका साक्षीदाराची साक्ष नोंदवून घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT