Panjim Police  Dainik Gomantak
गोवा

Panjim: तो रस्त्यावर झोपून दिवस काढायचा... अखेर बेघर युवकाला पणजी पोलिसांनी दिला मदतीचा हात

पोलिसांनी तात्काळ त्याची तपासणी करून त्याच्यावर सध्या आवश्यक उपचार सुरू असल्याचे पोलिसानी म्हटले आहे.

Pramod Yadav

पोलिस आपल्या हद्दीत नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत असतात. याशिवाय विविध समाजोपयोगी कामांना देखील हातभार लावत असतात. कोरोना काळात पोलिसांच्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले. याकाळात पोलिसांनी अनेकांना आर्थिक तसेच अन्न-धान्यांची देखील मदत पोलिसांनी देऊ केली.

पणजी पोलिसांनी एका बेघर युवकाला मदतीचा हात देऊ केला आहे. झाले असे की, एक युवक पणजीतील रस्त्यावर झोपल्याचे एकाला दिसून आले. याबाबत 03 फेब्रुवारी रोजी त्याने पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती पणजी पोलिसांना दिली. पणजी पोलिसांनी युवकाचा शोध घेतला मात्र तो काही मिळून आला नाही.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी पणजी पोलिस स्टेशन परिसरात हा युवक मिळाला. पोलिसांनी तात्काळ त्याची तपासणी करून त्याच्यावर सध्या आवश्यक उपचार सुरू असल्याचे पोलिसानी म्हटले आहे.

उत्तर गोवा पोलिसांनी ही घटना आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. युवक सापडला असून, तो सध्या उपचाराधीन आहे असे त्यांनी म्हटले आहे.

शहरी गजबजाटात आणि धकाधकीच्या जीवनात, जे लोक आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे खूप सोपे आहे. पण पणजी पोलिसांनी एक बेघर व्यक्तीची सुटका करून आत्मियता दाखवली आहे. आपण इतरांच्या जीवनात कसा बदल घडवू शकतो यावर चिंतन करण्यासाठी सर्वांनी थोडा वेळ काढूया. असे ट्विट पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT