पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपहरणाच्या घटना समोर येतायेत. यातच आता, तिसवाडी तालुक्यातून अशीच अपहरणाची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मूळ नेपाळी मुलीच्या अपहरणप्रकरणी पणजी पोलिसांनी ओडिशातील 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 15 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता 15 वर्षीय मुलीचे ओडिशा येथील तरुणाने अपहरण केले.
दरम्यान, संशयित आणि पीडिता एकाच इमारतीत वेगवेगळ्या भाड्याच्या खोलीत राहत होती. असे पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेवून पोलिसांनी विजय चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरिक्षक रश्मिका कवळेकर यांनी संशयित तरुणाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 137 (2) आणि गोवा बाल कायद्याचे कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी, ताळसांझर-फातोर्डा परिसरातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन फरार झालेल्या इरफान शेख (रा. बिजापूर-कर्नाटक) या संशयिताच्या फातोर्डा पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.