JFMC Theft Case Dainik Gomantak
गोवा

JFMC Theft Case: पणजी न्यायालयात चोरीचे प्रकरण! पोलिसांकडून मुजाहीद शेख याला अटक

वकिलाच्या वेशात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले आहे.

Pramod Yadav

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक असूनही आल्तिनो-पणजी येथील प्रथमश्रेणी न्यायालयाच्या मुद्देमाल कक्षात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. वकिलाच्या वेशात आलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, पणजी पोलिसांनी याप्रकरणी मुजाहीद शेख (रा. वाळपई) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दागिने व रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

या न्यायालयाचे कर्मचारी बुधवारी (दि.01) सकाळी ड्युटीवर आले असता तळमजल्यावर असलेल्या प्रथमश्रेणी न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील मुद्देमाल कक्षाचा दरवाचा व त्याच्या मागील बाजूस असलेले दार खुले असल्याचे आढळून आले. कपाटेही खुली असलेली व मुद्देमाल अस्तावस्त पडलेला दिसला.

त्यामुळे चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आल्यावर त्याची माहिती मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी पणजी पोलिसांना कल्‍पना दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. अखेर त्याला आज पोलिसांनी अटक केली आहे.

या ठिकाणी गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक प्रत्येक इमाततीसाठी तैनात केलेले आहेत. मात्र ज्या इमारतीत ही चोरी झाली तेथे असलेला सुरक्षारक्षक रात्रीच्यावेळी तेथे नसल्याने ही चोरी झाली असण्याची शक्यता आहे. या सुरक्षारक्षकाची चौकशी केली असता त्याचा निष्काळजीपणा समोर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT