Panaji Traffic Congestion Dainik Gomamtak
गोवा

Panaji Traffic Congestion: 'नो-पार्किंग'मध्येच वाहनांच्या रांगा; पणजीतील एमिडीयो ग्रासिया मार्गावरील बेशिस्त पार्किंगमुळे 18 जून रस्त्यावर वाहतूक कोंडी

Panaji No Parking Violations:पणजीतील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा पणजी चर्च येथून मळाच्या (फोन्तेन्हास) दिशेने जाणारा एमिडीयो ग्रासिया मार्ग सध्या बेशिस्त पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पणजीतील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा पणजी चर्च येथून मळाच्या (फोन्तेन्हास) दिशेने जाणारा एमिडीयो ग्रासिया मार्ग सध्या बेशिस्त पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे. प्रशासनाकडून या मार्गाला अधिकृतरीत्या ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आले असले तरी, दररोज रात्रीच्या सुमारास येथे मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जातात. या बेशिस्त पार्किंगमुळे केवळ याच मार्गावर नव्हे, तर पणजीतील मुख्य १८ जून रस्त्यावरील वाहतुकीलाही मोठा फटका बसत आहे.

रात्रीच्या वेळी या रस्त्याच्या कडेला पर्यटकांच्या गाड्या, टॅक्सी आणि खासगी चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. हा रस्ता मुळातच अरुंद आणि वळणाचा असल्याने, एका बाजूला वाहने उभी राहिल्यास वाहनांना मार्ग काढणे अत्यंत कठीण होऊन बसते. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या या वाहनांमुळे अपघाताचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

या बेशिस्त पार्किंगचे थेट परिणाम पणजीतील प्रमुख मार्ग असलेल्या १८ जून रस्त्यावर दिसून येत आहेत. मळा भागाकडे जाणारी वाहतूक संथ झाल्यामुळे वाहनांच्या रांगा थेट चर्च चौक आणि १८ जून रस्त्यापर्यंत येऊन पोहोचतात. परिणामी, रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणारे कर्मचारी, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.पणजी, ता. १४ (प्रतिनिधी): पणजीतील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा पणजी चर्च येथून मळाच्या (फोन्तेन्हास) दिशेने जाणारा एमिडीयो ग्रासिया मार्ग सध्या बेशिस्त पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे.

प्रशासनाकडून या मार्गाला अधिकृतरीत्या ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आले असले तरी, दररोज रात्रीच्या सुमारास येथे मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जातात. या बेशिस्त पार्किंगमुळे केवळ याच मार्गावर नव्हे, तर पणजीतील मुख्य १८ जून रस्त्यावरील वाहतुकीलाही मोठा फटका बसत आहे.

रात्रीच्या वेळी या रस्त्याच्या कडेला पर्यटकांच्या गाड्या, टॅक्सी आणि खासगी चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. हा रस्ता मुळातच अरुंद आणि वळणाचा असल्याने, एका बाजूला वाहने उभी राहिल्यास वाहनांना मार्ग काढणे अत्यंत कठीण होऊन बसते. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या या वाहनांमुळे अपघाताचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

या बेशिस्त पार्किंगचे थेट परिणाम पणजीतील प्रमुख मार्ग असलेल्या १८ जून रस्त्यावर दिसून येत आहेत. मळा भागाकडे जाणारी वाहतूक संथ झाल्यामुळे वाहनांच्या रांगा थेट चर्च चौक आणि १८ जून रस्त्यापर्यंत येऊन पोहोचतात. परिणामी, रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणारे कर्मचारी, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

न्यायालयाच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी?

पणजीतील दयानंद बांदोडकर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनंतर प्रशासनाने रस्त्यावर ‘नो-पार्किंग’चे पिवळे पट्टे मारले खरे; मात्र या मार्गावर अद्यापही वाहने पार्क केली जात आहेत. पट्टे मारण्यापलीकडे प्रत्यक्ष वाहतूक नियमन आणि कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जुन्या लेखा विभागाच्या (ओल्ड अकाउंट्स बिल्डिंग) समोर आणि जुन्या सचिवालयाच्या (ओल्ड सेक्रेटरीएट) मागील बाजूला प्रशासनाने ‘नो-पार्किंग झोन’ दर्शवण्यासाठी पिवळे पट्टे आखले आहेत; परंतु वाहनचालक या पिवळ्या पट्ट्यांवरच आपली वाहने उभी करत आहेत. हा भाग नो-पार्किंग झोन म्हणून अधिसूचित नसल्याने आम्ही गाड्या येथे पार्क करत असल्याचे एका नागरिकाने स्पष्ट केले.

प्रशासनाचे दुर्लक्ष

वाहतूक पोलिस व संबंधित प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. ‘नो पार्किंग’चे फलक असूनही रात्रीच्या वेळी कारवाई होत नसल्याने वाहनचालकांचे फावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: दयानंद मांद्रेकरांचा महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा; भाजपमधील अस्वस्थतेमुळे 2027 च्या निवडणुकीआधी राजकीय चर्चांना उधाण

Asia Cup Cricket: पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात गोव्याचा व्यंकट ठरला किमयागार; अखेरच्या क्षणी संधी मिळाली, नाबाद 11 धावा आणि 3 बळींची कमाल

खरी कुजबुज: 'जेनझी' आणि निवडणूक

Giri Babu Passes Away: 600 हून अधिक चित्रपट, पाच दशकांचा सुवर्णप्रवास, टॉलिवूडचा आधारस्तंभ हरपला! ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक गिरी बाबू यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन

Israel Attack On Gaza: हमासला मोठा धक्का! इस्रायली हवाई हल्ल्यात राफा ब्रिगेडच्या कमांडरचा खात्मा; अल-कसाम ब्रिगेडकडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT