Goa University  Dainik Gomantak
गोवा

New Academic Year : गोवा विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात

New Academic Year : दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रम शिकवणीला २७ नोव्हेंबरपासून सुरवात होईल. नाताळ सुट्टी २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत असेल. १६ एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. १७ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परीक्षा पूर्वतयारीसाठी रजा देण्यात येईल.

गोमन्तक डिजिटल टीम

New Academic Year :

पणजी, गोवा विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षाला बुधवारपासून सुरवात झाली असून शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १२ जून ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल तर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला २७ नोव्हेंबर २०२४ पासून सुरवात होईल व ८ मे २०२५ रोजी संपेल.

प्रवेश प्रक्रियेला जर काही तांत्रिक बाबी राहिल्या असतील तर त्या १४ जूनपर्यंत पूर्ण केल्या जातील. १८ जूनपासून शैक्षणिक अभ्यासक्रमाचे तास किंवा वर्ग घेण्यास सुरवात होईल, असे गोवा विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

गणेश चतुर्थीची सुट्टी १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर असेल. दिवाळी ब्रेक १ नोव्हेंबर रोजी तर पहिल्या शैक्षणिक सत्राचा अभ्यासक्रम ४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत रजा देण्यात येईल. ११ नोव्हेंबरपासून पहिल्या सत्राची परीक्षा घेण्यात येणार असून पहिल्या सत्राचा निकाल २४ डिसेंबरपूर्वी जाहीर केला जाईल.

दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रम शिकवणीला २७ नोव्हेंबरपासून सुरवात होईल. नाताळ सुट्टी २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत असेल. १६ एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. १७ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परीक्षा पूर्वतयारीसाठी रजा देण्यात येईल.

२२ एप्रिलपासून सत्रांत परीक्षेला सुरवात होईल. उन्हाळी सुट्टी ९ मेपासून सुरू होईल. दुसऱ्या सत्रांत परीक्षेचा निकाल ९ जूनपूर्वी जाहीर करण्यात येईल व १० जून २०२५ रोजी नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होईल, असे विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

Viral Video: खुर्ची विकण्यासाठी दुकानदाराचा भन्नाट कारनामा; आधी आपटली, मग उड्या मारल्या अन् शेवटी चक्क डान्स केला! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT