Agnel Fernandes

 

Dainik gomantak

गोवा

पणजी महापालिका आयुक्त आग्नेल फेर्नांडिस यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप निश्चित

ऑक्टोबर 2013 ते मार्च 2016 या दरम्यान पासपोर्ट कार्यालयात उप संचालक असताना फेर्नांडिस यांनी गैरमार्गाने पैसे कमविले असा त्यांच्यावर आरोप असून..

दैनिक गोमन्तक

मडगाव : सध्याचे पणजी महापालिका आयुक्त आणि पूर्वीचे सहाय्यक पासपोर्ट संचालक आग्नेल फेर्नांडिस यांच्यासह त्यांची पत्नी सिंथीया यांच्याविरोधात आज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी भ्रष्टाचार (Corruption) प्रतिबंधक कायद्याच्या 13 (2) व 13 (ई) कलमाखाली आरोप निश्चित केले.

दोन्ही संशयितांनी आपल्यावरील आरोप नाकारल्याने आता या प्रकरणी साक्षी पुरावे नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकरणी सीबीआयने (CBI) आरोपपत्र दाखल केले होते.

ऑक्टोबर 2013 ते मार्च 2016 या दरम्यान पासपोर्ट कार्यालयात उप संचालक असताना फेर्नांडिस यांनी गैरमार्गाने पैसे कमविले असा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्या घरावर छापा टाकला असता ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती त्यांच्याकडे सापडली. ही मालमत्ता बेहिशोबी असल्याचा सीबीआयचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घाबरू नका, पुरेसा पाणीसाठा! 15 दिवस पाऊस नसला, तरी टंचाई भासणार नाही - सुभाष शिरोडकर

Horoscope: शनिवारी चमकणार नशीब! 'या' राशींसाठी दिवस ठरणार खास; नोकरीत यश, व्यवसायात भरभराट आणि आर्थिक लाभाचे संकेत

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

SCROLL FOR NEXT