traffic congestion goa Dainik Gomantak
गोवा

Panaji: लोकोत्सव, स्मार्ट सिटी कामांमुळे वाढती वाहतूक कोंडी! वाहनधारकांनी नाहक प्रवास टाळण्याची गरज

Panaji Traffic Problem: दरवर्षीप्रमाणे कला अकादमीच्या दर्यासंगमावर भरणाऱ्या ‘लोकोत्सव’चे एक आकर्षण राहिले आहे. कला व संस्कृती खात्याच्यावतीने या लोकोत्सवाचे आयोजन होत आहे.

Sameer Panditrao

पणजी: कला अकादमीच्या दर्यासंगमावर शुक्रवारपासून २४ व्या ‘लोकोत्सवा''ला प्रारंभ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे शनिवारी आणि रविवारी या महोत्सवामुळे भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे उद्या व परवा या मार्गावरून सायंकाळच्या वेळी जाणे कटाक्षाने टाळणे आणि आपणही वाहतूक कोंडीचे एक घटक बनू नये, याचा विचार वाहनधारकांना करावा लागणार आहे.

दरवर्षीप्रमाणे कला अकादमीच्या दर्यासंगमावर भरणाऱ्या ‘लोकोत्सव’चे एक आकर्षण राहिले आहे. कला व संस्कृती खात्याच्यावतीने या लोकोत्सवाचे आयोजन होत आहे. बांदोडकर मार्गाच्या बाजूला या महोत्सवाचे ठिकाण असल्याने या महोत्सवासाठी लोकांची दरवर्षी मोठी गर्दी असते.

शनिवारी आणि रविवारी विशेषकरून सुटीचा दिवस असल्याने सायंकाळ या महोत्सवात खरेदी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी अनेकांची पावले पणजीच्या दिशेने वळतात. खरेतर दरवर्षीचा अनुभव घेता लोकांनीही या कार्यक्रमाला केव्हा आणि कधी जावे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. बांदोडकर मार्गावर कोंडी झाल्यानंतर पोलिसांना दोष देण्याशिवाय वाहनधारकांना पर्याय नसतो. सध्या पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT