PNG Jewellers Porvorim Dainik Gomantak
गोवा

PNG Jewellers Porvorim: पर्वरीत पीएनजी ज्‍वेलर्सच्‍या ‘लाईट-स्टाईल’ दालनाचे उद्‌घाटन; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

PNG Jewellers Porvorim: ‘पीएनजी’च्‍या विश्‍‍वासाचा वारसा पुढे नेत असून २२ कॅरेट आणि १८ कॅरेटमधील कमी वजनाच्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित करतो.

गोमन्तक डिजिटल टीम

PNG Jewellers Porvorim

पणजी, प्रदीर्घ काळापासून आपली परंपरा आणि दागिन्यांची उत्कृष्टता जपलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे गोव्याच्या मध्यभागी असलेल्या पर्वरी येथे ‘लाईट-स्टाईल बाय पीएनजी ज्वेलर्स’ हे भव्य दालन सुरू करण्यात आले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्‍या हस्‍ते या दालनाचे उद्‌घाटन करण्‍यात आले. यावेळी ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’ परिवारातील सदस्य उपस्थित होते.

‘पीएनजी’ची ‘लाईट-स्टाईल’ ही पीएनजी ज्वेलर्सअंतर्गत एक उपब्रँड श्रेणी असून आजच्या सक्षम महिलांसाठी अत्यंत समर्पितवृत्तीने डिझाईन केलेली आहे.

हा ब्रँड ‘पीएनजी’च्‍या विश्‍‍वासाचा वारसा पुढे नेत असून २२ कॅरेट आणि १८ कॅरेटमधील कमी वजनाच्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित करतो.

नोकरी व व्यवसाय करणाऱ्या महिलांना दैनंदिन दिनचर्येला पूरक असे दागिने आवडतात. अशा महिलांसाठी ‘लाईट-स्टाईल’ योग्य आहे. ‘पीएनजी’चे हे नवीन दालन पर्वरीत मोक्याच्या ठिकाणी असून तेथे कमी वजनाच्या दागिन्यांची उत्कृष्ट आणि वैविध्यपूर्ण श्रेणी अनुभवता येणार आहे. एक हजार चौरस फूट जागेत हे दालन विस्तारलेले आहे.

विशेष योजना

‘लाईट-स्टाईल’मध्‍ये सोन्याच्या, हिऱ्याच्या दागिन्यांपासून चांदीच्या उत्पादन विस्तृत श्रेणीसह कानातले पेंडंट सेट, चेन सेट, नेकलेस आणि ब्रेसलेट यांसारख्या श्रेणींचा समावेश आहे.

आदराचं आणि कौतुकाचं प्रतीक म्हणून ‘पीएनजी’ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना आखली आहे, ज्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्के तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत मिळणार आहे.

महिलांना व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील दागिन्यांचा वापर सहजपणे करता यावा या उद्देशाने कमी वजनाचे उत्कृष्ट दागिने घडविण्यात आले आहेत. ‘लाईट-स्‍टाईल’ हा नवीन उपब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’ कुटुंबाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून त्‍याचा विस्तार करण्याच्या दिशेने हे महत्त्‍वपूर्ण पाऊल आहे.

- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक (पीएनजी ज्वेलर्स)

दागिने म्हणजे व्यक्तिमत्त्व व भावनांची सांगड असते. ‘लाईट-स्‍टाईल’ या दालनाच्या माध्‍यमातून पीएनजी ज्वेलर्सने दागिन्यांची खास शैली ग्राहकांसाठी उपलब्‍ध करून दिली आहे. या दालनाच्या उद्‌घाटनाचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी पीएनजी ज्वेलर्स परिवाराचे अभिनंदन करते.

- मृण्मयी देशपांडे, प्रसिद्ध अभिनेत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT