Goa Court Judgement Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मदतीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप, तक्रारदाराकडून जबाबास नकार; आरोपीची निर्दोष सुटका

Goa Crime News: आरोपीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी सुनावला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुख्य साक्षीदार तथा तक्रारदार महिलेने न्यायालयात जबाब देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीस संशयाचा लाभ देत पणजी येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने (पॉक्सो) कार्ल हेंड्रिक्स (वय ३८) यांना निर्दोष मुक्त केले आहे.

आरोपीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी सुनावला. महिलेचा जबाब उपलब्ध नसल्याने आणि सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे व विसंगत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

ही घटना ४ मार्च २०१९ रोजी उत्तर गोव्यात घडली होती. तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले होते, की ‘एनजीओ’शी संबंधित असलेल्या आरोपी हेंड्रिक्स यांनी मदतीच्या बहाण्याने तिच्या घरी जाऊन लैंगिक अत्याचार केला होता.

अनेकवेळा न्यायालयीन समन्स दिल्यानंतरही तक्रारदाराने सांगितले, की ती आजारी असल्याने न्यायालयात येऊ इच्छित नाही आणि प्रकरण पुढे नेऊ इच्छित नाही. तसेच या प्रकरणातील केंद्रीय न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल हरवला असल्याचे नोंदविण्यात आले आणि तो न्यायालयासमोर सादर झाला नाही, असे न्यायालयाने आदेशात अधोरेखित केले.

फोन, कॉल डेटा नाही

तपासादरम्यान तक्रारदार महिलेचा फोन, कॉल डिटेल रेकॉर्ड, लोकेशन डेटा गोळा करण्यात आले नाहीत; घटनास्थळी कोणतीही फॉरेन्सिक टीम पाठविण्यात आली नव्हती.

न्यायालयात जबाब देणाऱ्या डॉक्टरांनी स्वतः तपासणी केली नव्हती, त्यांनी केवळ दुसऱ्या डॉक्टरच्या स्वाक्षरीची ओळख दिली. वैद्यकीय अहवालात कोणतीही ताजी दुखापत आढळली नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

Sheikh Hasina: 'हातकड्या घालूनच परत आणू...', शेख हसीना यांच्या घरवापसीवर बांगलादेशी परराष्ट्र मंत्र्यांची धमकी; 16 डिसेंबरचा प्लॅन फसणार

Indian Football League: धेंपो क्लबला काश्मीरमध्ये 3-1 ने धक्का; रियल काश्मीरने उघडले विजयाचे खाते

Aguada Fort Wall Collapse: 400 वर्षे जुन्या आग्वाद किल्ल्याच्या खंदकाची भिंत कोसळली; ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न

SCROLL FOR NEXT