elvis gomes Dainik Gomantak
गोवा

Elvis Gomes: नाईट लाईफ इंडस्ट्रीत 30 टक्क्यांनी वाढ

Elvis Gomes: काँग्रेस नेत्यांनी घेतली कामगार आयुक्तांची भेट

दैनिक गोमन्तक

Elvis Gomes: राज्यात नाईट लाईफ इंडस्ट्री वाढू लागली आहे. कॅसिनो, डान्स बार सुरू आहेत, पब सुरू होणार आहेत या सर्वांसाठी किती लोक कामासाठी लागणार आहेत. याची माहिती कामगार आयुक्तालयाकडे नसल्याचे दिसून आले आहे.

आम्ही ‘रोजगार मेळा’बाबतची सर्व माहिती व अशा नाईट लाईफ इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गाची नोंदीत माहिती ठेवणे आवश्‍यक असल्याचे कामगार आयुक्त राजू गावस यांना सांगितले असल्याची माहिती काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी दिली.

याप्रसंगी गोम्स यांच्यासह माजी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, विशाल वळवईकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. गोम्स म्हणाले की, नीती आयोगाने राज्य सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे. यापूर्वी ताळगावच्या कम्युनिटी हॉलमध्ये असाच रोजगार मेळावा झाला, त्याचे पुढे काय झाले.

आता श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये रोजगार मेळा झाला, त्यात 10 हजार उमेदवार आले, त्यातून 5000 जणांची लघु यादी बनविण्यात आली, तर 500 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे सांगण्यात आले, परंतु या मेळाविषयी काहीही डाटा त्यांनी तयार केलेला नाही. केवळ सरकारी पैशांची उधळपट्टी केली.

नोकऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची

खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कायमस्वरूपी नसतात. रोजगार मेळावा घेतला म्हणून झाले असे नाही, परंतु खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी कोण देणार. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या 500 युवकांना नोकऱ्या दिल्या, त्यांच्या नोकरीची सुरक्षितता काय? त्यांना वेतन किती मिळेल, अशा सर्व प्रश्‍नांचा विचार त्यांनी करायला हवा. ज्यांना नोकऱ्या देण्यात आल्या, त्यांच्या सुरक्षिततेची हमी काय असणार हा मुद्दा आम्ही कामगार आयुक्त राजू गावस यांच्याकडे मांडला असल्याचे विजय भिके म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT