Goa Carnival Festival 2022 Dainik Gomantak
गोवा

कार्निव्हलसाठी नटली राजधानी पणजी

तयारी अंतिम टप्प्यात : जागोजागी रंगीबिरंगी पताका, आकर्षक मुखवटे

दैनिक गोमन्तक

पणजी: येत्या शनिवार दि. 26 फेब्रुवारीपासून राज्‍यात कार्निव्हल महोत्सवाचा आरंभ राजधानी पणजी शहरातून होत आहे. पणजी महानगरपालिका तसेच आयोजकांकडून या महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पणजी बसस्थानक ते कला अकादमीपर्यंत होणाऱ्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी रस्‍त्‍यावर जागोजागी सजावट करण्‍यात येत आहे. एकंदरीत कार्निव्‍हलसाठी पणजी (Panaji) शहर नटले आहे. (Goa Carnival Festival News Updates)

विविध प्रकारच्या रंगीबिरंगी पताका, आकर्षक मुखवटे आदींनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आदिलशहा पॅलेस समोर मंचाची उभारणी करण्याचे कामही जलदगतीने सुरू आहे. कार्निव्हल मिरवणुकीवेळी ‘किंग मोमो’ ज्या रथातून मार्गक्रमण करणार आहे, तो रथ सजवण्‍याचे कामही सुरू आहे. विविध ठिकाणी विद्युत रोषणाई, फलक उभारण्यात येणार आहेत. त्यांचे काम अंतिम टप्‍प्‍यात पोहोचले आहे. दरम्‍यान, कार्निव्हलसाठी (Carnival Festival) देशी तसेच विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात. यंदा पर्यटक महोत्सवात सहभागी होण्‍याची शक्‍यता आहे. देशी पर्यटकांची रेलचेल पणजी शहरात वाढली आहे, मात्र त्‍यामानाने विदेशी पर्यटकांची संख्‍या खूपच कमी आहे.

मनपा कर्मचाऱ्यांनी कार्निव्हल मिरवणुकीसाठी कंबर कसली आहे. मिरवणुकीच्‍या मार्गाची सफाई करतानाच बाजूला पडलेले प्‍लास्‍टिक, कचरा काढण्याचे काम तसेच लहान-सहान डागडुजी करण्‍यात येत आहे. गेली दोन वर्षे कोविड महामारीच्या संक्रमणामुळे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा महामारी नियंत्रणात आल्‍याने तसेच गोव्यातील जनतेचे शंभर टक्के लसीकरण (Vaccination) झाल्याने कार्निव्हलचा उत्साह वाढला आहे. कोविडसंबंधी शासनाने घालून दिलेल्‍या नियमांचे पालन करून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT