Crime News Dainik Gomantak
गोवा

Panaji News : कॅसिनोतील जुगारात हरल्याने कर्नाटकच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल खान हा मूळचा तुमकूर-कर्नाटक येथील असून गेल्या 26 मे 2023 रोजी गोव्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कर्नाटकातून गोव्यात पर्यटनासाठी आलेला साहिल खान या 25 वर्षीय तरुणाने मळा-पणजी येथील हॉटेलमध्ये पंख्याला ट्रॅक पँटने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल खान हा मूळचा तुमकूर-कर्नाटक येथील असून गेल्या 26 मे 2023 रोजी गोव्यात आला होता.

त्याने मळ्यातील एका हॉटेलात 30 मे पर्यंत रूम आरक्षित केला होता. तो येताना मोठ्या प्रमाणात रक्कम आपल्या मित्रांकडून घेऊन आला होता. आल्यापासून तो संध्याकाळी तरंगत्या कॅसिनोवर जुगार खेळण्यास जात होता व त्यानतंर रात्री उशिरा हॉटेलवर येत होता. मंगळवारी (ता.30) सकाळी तो हॉटेल सोडणार होता.

सकाळी 11 वाजले तरी तो उठत नसल्याने हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने ही बाब हॉटेल व्यवस्थापकाला सांगितली. पणजी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर साहिल खान याच्या रूमचे दार धडक देऊन उघडण्यात आले.

पोलिसांनी रूमचे दार उघडताच आतमध्ये साहिल खान हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह त्वरित खाली उतरवण्यात आला. त्याने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी ठेवली नव्हती तसेच आत्महत्येमागील कारण लिहून ठेवले नव्हते.

बहुतेक रक्कम कर्जाची! :

युवकाने कॅसिनोवर जुगारात मोठी रक्कम घालवली होती. त्यातील बहुतेक रक्कम कर्जाने घेऊन गोव्यात नशीब अजमावण्यासाठी तो आला होता. मात्र, सर्वच पैसे गमावल्याने कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असे मत पोलिसांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT